इम्रान खान यांच्या शपथविधीला जाणारे गद्दार- सुब्रमण्यम स्वामी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 06:00 PM2018-08-02T18:00:23+5:302018-08-02T18:01:48+5:30

शपथविधी सोहळ्याला जाणाऱ्यांना राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

those who participate in imran khans swearing ceremony should be tried under Treason says swamy | इम्रान खान यांच्या शपथविधीला जाणारे गद्दार- सुब्रमण्यम स्वामी

इम्रान खान यांच्या शपथविधीला जाणारे गद्दार- सुब्रमण्यम स्वामी

googlenewsNext

नवी दिल्ली: इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारतातून जाणारे गद्दार असतील, असं भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. खान यांच्या शपथविधीसाठी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, कपिल देव, नवज्योत सिंग सिद्धू आणि अभिनेता आमीर खानला निमंत्रित करण्यात आलेलं आहे. यापैकी सिद्धू यांनी निमंत्रणाबद्दल जाहीर भाष्य करत आपण शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर स्वामी यांनी केलेल्या विधानानं राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. 

इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी जे भारतातून जातील, त्यांना गद्दार समजण्यात येईल, असं भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. 'नवज्योत सिंग सिद्धू फक्त माजी क्रिकेटपटू नाहीत, तर ते देशाचे माजी खासदार आहेत. जर ते इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले, तर त्यांना गद्दार समजण्यात येईल,' असं स्वामींनी म्हटलं. स्वामी यांनी इम्रान खान यांची तुलना मोहम्मद घोरीशी केली आहे. 'महाराणा प्रताप यांनी मोहम्मद घोरीला एक संधी दिली होती. त्यानंतर पुढे काय झालं, ते सर्वांना माहित आहे,' असं स्वामी म्हणाले. 

इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्यांवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील त्यांनी केली. पंजाब सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांनी इम्रान खान यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे. नवज्योत सिंह सिद्धू यांनी इम्रान खान यांचं तोंडभरुन कौतुकदेखील केलं आहे. इम्रान खान चारित्र्यसंपन्न व्यक्ती असून लोकांना एकत्र आणण्याची क्षमता इम्रान त्यांच्याकडे आहे, अशी स्तुतीसुमनं सिद्धू यांनी उधळली आहेत. खेळाडू लोकांना एकत्र आणतात. भौगोलिक सीमांची बंधनं मोडून माणसांना एकत्र आणण्याचं कौशल्य खेळाडूंकडे असतं, अशा शब्दांमध्ये सिद्धू यांनी इम्रान खान यांचं कौतुक केलं आहे. 
 

Web Title: those who participate in imran khans swearing ceremony should be tried under Treason says swamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.