'ते' आश्रमशाळेच्या मुलींना अश्लील गाण्यावर नृत्य करण्यास भाग पाडत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 05:34 AM2019-01-08T05:34:54+5:302019-01-08T05:35:24+5:30

बलात्कारही करीत होते; सीबीआयच्या आरोपपत्रातील माहिती

They 'force' the girls of the ashram school to dance on the obscene song | 'ते' आश्रमशाळेच्या मुलींना अश्लील गाण्यावर नृत्य करण्यास भाग पाडत

'ते' आश्रमशाळेच्या मुलींना अश्लील गाण्यावर नृत्य करण्यास भाग पाडत

Next

पाटणा : बिहारच्या मुझफ्फरपूर येथील आश्रमशाळेचा संचालक ब्रजेश ठाकूर तेथील मुलींना अत्यंत तोकड्या कपड्यांत अश्लील गाण्यांच्या तालावर पाहुण्यांसमोर नृत्य करण्यास भाग पाडत असे. त्यानंतर हे पाहुणे त्या मुलींवर बलात्कार करीत. त्याच्या भीषण कहाण्या सीबीआय तपासातून उजेडात आल्या आहेत.

याप्रकरणी सीबीआयने विशेष पोस्को न्यायालयात १९ डिसेंबर रोजी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात म्हटले आहे की, पाहुण्यांसमोर नाचण्यास नकार देणाऱ्या मुलींना त्या रात्री जेवणात फक्त चपाती व मीठ इतकेच देण्यात येई. ज्या मुली नृत्य करीत त्यांना उत्तम जेवण मिळत असे. आश्रमशाळेतील गैरप्रकारांची माहिती असलेल्या सरकारी अधिकाºयांनी तात्काळ कारवाई का केली नाही, याविषयी या आरोपपत्रात काहीच उल्लेख नाही. मुलींवरील अत्याचारप्रकरणी ब्रिजेश ठाकूरसह २१ आरोपींची नावे सीबीआयने आरोपपत्रात नमूद केली आहेत. बलात्कार झालेल्या ३३ मुलींसह १०१ मुलींची नावे साक्षीदार म्हणून नोंदविली आहेत. कारवाईस टाळाटाळ करणाºया बिहारच्या समाजकल्याण अधिकाºयांकडे सीबीआयने दुर्लक्ष केल्याबद्दल बालहक्क चळवळीतील कार्यकर्ते अ‍ॅड. के. डी. मिश्रा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मुलांवर अत्याचार होत असल्याची माहिती कळताच संबंधिताने ती लगेचच पोलिसांना कळवावी, असे पोस्को कायद्याच्या कलम १९ मध्ये म्हटलेले आहे. 

अधिकाºयांवर हवी कारवाई

च्मुझफ्फरपूर आश्रमातील लैंगिक अत्याचारांची माहिती गेल्या वर्षीच्या प्रारंभीच अधिकाºयांना मिळाली होती. तरी ती त्यांनी पोलिसांना कळविली नाही. त्यामुळे या अधिकाºयांवरही सीबीआयने कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड. के. डी. मिश्रा यांनी केली.

Web Title: They 'force' the girls of the ashram school to dance on the obscene song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.