या मंदिरांत आशीर्वाद मिळतो आणि कर्जही

By admin | Published: April 20, 2017 12:42 AM2017-04-20T00:42:35+5:302017-04-20T00:42:35+5:30

मंदिरात होणारी गर्दी आपण नेहमीच पाहतो. अर्थात, त्या ठिकाणी कोणी काही मागणे

In these temples, there is a blessing and a loan | या मंदिरांत आशीर्वाद मिळतो आणि कर्जही

या मंदिरांत आशीर्वाद मिळतो आणि कर्जही

Next

सिमला : मंदिरात होणारी गर्दी आपण नेहमीच पाहतो. अर्थात, त्या ठिकाणी कोणी काही मागणे घेऊन जातो तर कुणाला हवी असते मन:शांती, पण तुम्ही असे मंदिर पाहिले आहे का, जे तुमचे आर्थिक प्रश्नही मार्गी लावते. हिमाचल प्रदेशमधील या मंदिराची माहिती जाणून घ्या. हिमाचलच्या निसर्ग सानिध्यात सिमला, सिरमौर, किन्नौर आदी भागात अशी मंदिरे आहेत, जी येथे येणाऱ्या व्यक्तीला प्रसंगी कर्जही देतात. अनेक वर्षांची ही परंपरा आहे. हे कर्ज एक वर्षासाठी दिले जाते आणि त्यावर वार्षिक दोन ते तीन टक्के व्याज चुकते करावे लागते. जर एखादी व्यक्ती हे कर्ज चुकते करू शकत नसेल, तर त्याचे कर्ज माफ केले जाते. कर्ज मागणारी व्यक्ती खरोखरच गरजवंत आहे काय, याची चाचपणी मंदिर व्यवस्थापन करते. कर्ज घेणारी व्यक्ती परतफेड करू शकेल अथवा नाही हे कर्ज देताना बघितले जात नाही. केवळी नगदच नाही, तर येथून धान्यही मिळते.

Web Title: In these temples, there is a blessing and a loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.