काँग्रेस व आप यांच्यात दिल्लीत समझोता नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 05:28 AM2019-04-13T05:28:55+5:302019-04-13T05:29:06+5:30

सर्वत्र तिरंगी लढती : अन्य राज्यात ‘आप’ने जागा मागितल्याचा परिणाम

There is no agreement between Congress and AAP in Delhi | काँग्रेस व आप यांच्यात दिल्लीत समझोता नाहीच

काँग्रेस व आप यांच्यात दिल्लीत समझोता नाहीच

Next

नवी दिल्ली : दिल्लीच्या मतदारसंघांमध्ये आम आदमी पक्षाशी आमचा समझोता होणार नाही, असे काँग्रेसतर्फे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. त्यामुळे दिल्लीत सर्वत्र भाजप, काँग्रेस व आम आदमी पक्ष असे तिरंगी सामने होतील. काँग्रेस आपले उमेदवार १४ एप्रिल रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे.


आम आदमी पक्षाने दिल्लीत काँग्रेसशी समझोता करण्याची इच्छा व तयारी दर्शवतानाच, हरयाणा व पंजाबमध्येही आपण जागावाटप करावे, अशी अट घातली होती. त्यास हरयाणा व पंजाबमधील काँग्रेस नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे काँग्रेसने आपची मागणी अमान्य केली. आम आदमी पक्ष दिल्लीतील तीन जागा आमच्यासाठी सोडणार असेल, तर आजची आमची आपशी समझोत्याची तयारी आहे, असे काँग्रेसचे नेते पी. सी. चॅको यांनी सांगितले. दिल्लीत दोन्ही पक्षांत जागावाटप शेवटच्या टप्प्यात असतानाच आपने हरयाणा व पंजाबमध्येही आघाडीची अट ठेवली. त्यामुळे संपूर्ण समझोताच फिसकटला. चॅको म्हणाले की, २0१४ साली आम्हाला दिल्लीत २६ टक्के, तर आपला २१ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांची मते ४७ टक्के होती. या स्थितीत आपने आम्हाला किमान तीन जागा सोडणे अपेक्षित होते. तसे होणार असेल तर आजही आम्ही तयार आहोत.


याउलट विधानसभा निवडणुकांत मिळालेल्या मतांच्या आधारे जागा सोडण्याची आपची तयारी आहे. त्या निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी झाला नव्हता आणि आपला ७0 पैकी ६७ ठिकाणी विजय मिळवला होता. उरलेल्या तीन जागा भाजपने मिळवल्या होत्या.

भाजपचे उमेदवार लवकरच
आप व काँग्रेस यांच्यात समझोता होतो का, याकडे भाजपचे लक्ष लागले होते. त्यामुळे भाजपने दिल्लीतील उमेदवार जाहीर केले नव्हते. आता दोघांत आघाडी होत नसल्याने भाजपही उमेदवार लवकर घोषित करेल, असे सांगण्यात आले.

Web Title: There is no agreement between Congress and AAP in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.