एवढंसं कारण...! मंत्र्यानं सर्वांसमोर बॉडीगार्डच्या कानाखाली लगावली; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 09:33 PM2023-10-06T21:33:38+5:302023-10-06T21:34:54+5:30

या व्हिडिओमध्ये तेलंगणाचे गृहमंत्री संबंधित सुरक्षा अधिकाऱ्याला बुके मागतात दिसत आहेत. मात्र, त्या क्षणी पीएसओकडे बुके नसतो, म्हणून ते त्याच्या कानाखाली थापड मारतात.

Telangana Home Minister slaps his security guard in public; Because he was late in giving the bouquet of flowers | एवढंसं कारण...! मंत्र्यानं सर्वांसमोर बॉडीगार्डच्या कानाखाली लगावली; Video व्हायरल

एवढंसं कारण...! मंत्र्यानं सर्वांसमोर बॉडीगार्डच्या कानाखाली लगावली; Video व्हायरल

googlenewsNext

तेलंगणाचे गृह मंत्री मेहमूद अली यांनी, शुक्रवारी मंत्री तलसानी श्रीनिवास यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, लवकर बुके मिळाला नाही, म्हणून कथितपणे आपल्याच एका सुरक्षा रक्षकाच्या कानाखाली थापड मारल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जबरदस्त व्हायरल हेत आहे. या व्हडिओमध्ये मेहमूद अली वाढदिवसाच्या कार्याक्रमात सहकारी मंत्री तलसानी श्रीनिवास यादव यांची गळाभेट घेताना दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे, मेहमूद अली याच्याकडे तेलंगणा सरकारमध्ये जेल आणि अग्निशमन सेवेचा अतिरिक्त प्रभारही आहे.

बुके लवकर मिळाला नाही म्हणून...  -
या व्हिडिओमध्ये तेलंगणाचे गृहमंत्री संबंधित सुरक्षा अधिकाऱ्याला बुके मागतात दिसत आहेत. मात्र, त्या क्षणी पीएसओकडे बुके नसतो, म्हणून ते त्याच्या कानाखाली थापड मारतात. माध्यमांतील वृत्तांनुसार, ही घटना तेलंगणाचे पशुसंवर्धन मंत्री तलसानी श्रीनिवास यादव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात घढली. ही घटना घढली, तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी, काही सरकारी अधिकारी आणि बीआरएसचे नेतेही तेथे उपस्थित होते. या घटनेनंतर, भाजपने मंत्र्यांच्या या कृत्यावरून बीआरएस सरकारवर टीका करत, सार्वजनिक माफी मागण्याचीही मागणी केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भाजपचे वरिष्ठ नेते शहजाद पूनावाला यांनी म्हटले आहे, “ही पूर्णपणे लज्जास्पद आणि धक्कादायक घटना आहे. तेलंगणाच्या गृहमंत्र्याने आपल्या सुरक्षारक्षकाला बुके द्यायला उशीर केला, म्हणून सार्वजनिक ठिकाणी थापड मारली. हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे. या घटनेवरून बीआरएसच्या व्हीव्हीआयपी अहंकाराची मानसिकता दिसून येत." एवढेच नाही, तर त्यांनी आज एका सुरक्षारक्षकाला  थपड मारली. त्यांना पदावरून काढून टाकले जाणार का? त्यांना तेलंगणाच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागायला लावली जाणार का? की व्होट बँकेच्या नावाखाली त्यांना पदावरच कायम ठेवले जाणार? असे सवालही यावेळी पुणावाला यांनी केले आहेत.
 

Web Title: Telangana Home Minister slaps his security guard in public; Because he was late in giving the bouquet of flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.