आश्चर्य! मृत्यूनंतर 'तो' चक्क तिरडीवरुन आला अन् केक कापला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 03:19 PM2019-07-01T15:19:58+5:302019-07-01T15:40:14+5:30

सरकारी लाल फितीत सापडलेल्या लाल बिहारी यांनी उत्तर प्रदेश सरकारने आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल 20 कोटी रुपये भरपाई देण्यासाठी कोर्टात केसही टाकली होती.

Surprise! 25 rebirth celebration in UP | आश्चर्य! मृत्यूनंतर 'तो' चक्क तिरडीवरुन आला अन् केक कापला

आश्चर्य! मृत्यूनंतर 'तो' चक्क तिरडीवरुन आला अन् केक कापला

लखनऊ - तिरडीवरुन शरीर आलं अन् त्यावरुन उठून मृत झालेल्या माणसाने केक कापला हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल पण हे प्रत्यक्षात घडलं आहे. यूपीतील आजमगडमधील रहिवाशी लाल बिहारी आपला 25 वा पुर्नजन्म दिवस सोहळा साजरा करतात. 25 वर्षापूर्वी सरकारी कागदपत्रात त्यांना मृत घोषित केले होतं मात्र लाल बिहारी आजतागायत जिवंत आहेत आणि दरवर्षी अशाच रितीने पुर्नजन्म सोहळा साजरा करतात. सरकारी लालफितीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी ते अनोखं आंदोलन करतात. 

यंदा लाल बिहारी यांच्यासोबत हा पुर्नजन्म सोहळा साजरा करण्यासाठी चित्रपट निर्माते सतीश कौशिकदेखील उपस्थित होते. सतीश कौशिक लाल बिहारी यांच्या जीवनावर चित्रपट आणत आहे. 64 वर्षीय लाल बिहारी यांनी सांगितले की, सरकारी अधिकाऱ्यांनी 1976 मध्ये कागदपत्रात त्यांना मृत घोषित केलं होतं. जमिनीच्या वादात आजमगडच्या सरकारी पुराव्यामध्ये त्यांना मृत घोषित केल्याने त्यांनाही धक्का बसला. याविरोधात अनेक वर्ष कायदेशीर लढाई लढल्यानंतर 30 जून 1994 रोजी लाल बिहारी स्वत:ला जिवंत असल्याचं सिद्ध करण्यात यशस्वी झाले. त्याच दिवसाला ते पुर्नजन्म म्हणून साजरा करतात. 

लाल बिहारी मृतक का 25 वां पुनर्जन्म दिवस लखनऊ में मनाया गया

सरकारी लाल फितीत सापडलेल्या लाल बिहारी यांनी उत्तर प्रदेश सरकारविरोधात आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल 20 कोटी रुपये भरपाई देण्यासाठी कोर्टात केसही टाकली होती. त्यांचे वकील कृष्णा कन्हैया यांनी सांगितले की, हायकोर्टाने सरकारला या प्रकरणात भरपाईसाठी विचारणा केली मात्र या प्रकरणातील कागदपत्रे गहाळ झाली त्याची चौकशी सध्या सुरु आहे. 

लाल बिहारी यांनी देशातील 20 हजार जणांना जिवंत असून मृत घोषित केल्याचं सांगितले. अशा प्रकरणात कोर्टात तसेच सरकारी कार्यालयात अनेक जण आवाज उठवित आहेत. काही दिवसांपूर्वीच मानवाधिकार आयोगाने 1500 लोकांना पुन्हा कागदोपत्री जिवंत घोषित करण्याचे आदेश दिले होते. लाल बिहारी यांनी त्यांच्या नावासमोर मृतक शब्द लिहिण्यास सुरुवात केली त्याचसोबत मृतक संघ बनवून अशारितीने सरकारी कारभाराचा ज्यांना फटका बसला त्यांची मदत करण्यास सुरुवात केली.  

Web Title: Surprise! 25 rebirth celebration in UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.