मोदींच्या सभेहून परतणाऱ्य़ा भाजपा समर्थकांवर तुफान दगडफेक; एक पोलीस ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 10:14 PM2018-12-29T22:14:45+5:302018-12-29T22:15:43+5:30

मुख्यमंत्री योगी यांच्याकडून 50 लाखांची मदत जाहीर 

stone pelting on BJP supporters returning from Modi's rally; A police killed | मोदींच्या सभेहून परतणाऱ्य़ा भाजपा समर्थकांवर तुफान दगडफेक; एक पोलीस ठार

मोदींच्या सभेहून परतणाऱ्य़ा भाजपा समर्थकांवर तुफान दगडफेक; एक पोलीस ठार

Next

गाजीपूर : बुलंदशहरमध्ये भडकलेल्या हिंसेवेळी एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या झाल्याची घटना ताजीच असताना गाजीपूरमध्येही एका पोलीस जवानाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.


 उत्तरप्रदेशमधील गाजीपूरमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती. या सभेला गेलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांवर निषाद पार्टी आणि एसबीएसपीशी संबंधित आंदोलनकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये सुरेश कुमार हा पोलीसही जखमी झाला. ही घटना कठवा मोडच्या जवळ घडली. भाजपाच्या कार्यकर्त्यांवर सुहेलदेव भारतीय समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप केला जात आहे. यानंतर दोन्ही बाजुंनी दगडफेक होऊ लागली. यामुळे पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी हस्तक्षेप केला. 




या दगडफेकीमध्ये सुरेश यांच्यासह अन्य दोन पोलीस जखमी झाले. मात्र, सुरेश यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांकडून गुप्तता बाळगण्यात येत असून अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत. घटनेनंतर पोलिसांनी निषाद पक्षाच्या 10 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच ठिकठिकाणी छापे मारण्यात येत आहेत. 




मुख्यमंत्री योगी यांच्याकडून 50 लाखांची मदत जाहीर 
मृत शिपाई सुरेश याच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामध्ये सुरेश यांच्या पत्नीला 40 लाख आणि त्याच्या आई-वडिलांना 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत. शिवाय सुरेशच्या पत्नीला पेन्शन आणि परिवारातील सदस्याला नोकरी देण्याची घोषणाही केली आहे. 



 

Web Title: stone pelting on BJP supporters returning from Modi's rally; A police killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.