स्पोर्टस् नर्सरी जोड...

By admin | Published: May 14, 2014 01:31 AM2014-05-14T01:31:29+5:302014-05-14T01:31:29+5:30

...इन्फो...

Sports Nursery Attendance ... | स्पोर्टस् नर्सरी जोड...

स्पोर्टस् नर्सरी जोड...

Next
...
न्फो...
क्रीडा धोरणातील महत्त्वाच्या तरतुदी
* वार्षिक खर्चाच्या ५ टक्के क्रीडा विभागासाठी तरतूद
* पालिकेच्या तरणतलावांचे खासगीकरण
* १४ नवीन क्रीडा संकुले विकसित करणार
* १९ व्यायामशाळा बांधणार, त्यापैकी पाच फक्त महिलांसाठी
* राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना दोन लाख रुपयांपर्यंत मदत
* दरवर्षी १२ ते १८ डिसेंबर दरम्यान नाशिक ऑलम्पिक
* सर्व शिक्षा अभियानाच्या धर्तीवर क्रीडा अभियान

..इन्फो...
खेळाडूंना पालिकेत नोकरी
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेत्या खेळाडूंच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा शहरातील नागरिकांना मिळावा यासाठी त्यांना प्रशिक्षकपदी नियुक्ती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतलेल्या किंवा राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणार्‍या खेळाडूंना स्पोर्ट्स नर्सरीत क्रीडा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे.
..इन्फो...
खेळाडूंसाठी आर्थिक प्रोत्साहन
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंना आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७५ हजार तर तृतीय क्रमांकासाठी ५० हजार रुपये मदत देण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांसाठी २५ हजार, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार तर तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपयांची मदत देण्यात येईल. राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकासाठी ७ हजार, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार तर तृतीय क्रमांकासाठी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

Web Title: Sports Nursery Attendance ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.