काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर खुद्द सोनिया गांधीच नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 11:12 AM2019-04-03T11:12:56+5:302019-04-03T11:13:43+5:30

लोकसभा निवडणूक 2019 साठी काँग्रेसकडून प्रकाशित करण्यात आलेल्या जाहीरनाम्यावर सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टीने टीकेची झोड उठवल्यानंतर आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे

Sonia Gandhi Not happy with Congress' manifesto | काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर खुद्द सोनिया गांधीच नाराज

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर खुद्द सोनिया गांधीच नाराज

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक 2019 साठी काँग्रेसकडून प्रकाशित करण्यात आलेल्या जाहीरनाम्यावर सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टीने टीकेची झोड उठवल्यानंतर आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जाहीरनामा पुस्तिकेच्या कव्हर पेजवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा फोटो लहान आकारात छापल्यामुळे आक्षेप दर्शवला आहे. 

काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनुसार युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जाहीरनामा कमिटीचे सदस्य राजीव गौडा यांना फटकारले आहे. जाहीरनामा पुस्तिकेचे कव्हर पेज लोकांना आकर्षित करण्यासारखं असायला हवं. मात्र तसं झालं नाही. त्याचसोबत राहुल गांधी यांचा फोटो मोठ्या आकारात छापणे गरजेचे होते पण छोट्या आकाराचा फोटो छापण्यात आला आहे असं सोनिया गांधी यांचे म्हणणं आहे.

जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासनं चांगली असली तरी कव्हर पेज लोकांना आकर्षित करणारे नाही. ज्यावेळेला काँग्रेसच्या जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रम सुरु होता त्याचवेळी सोनिया गांधी यांनी राजीव गौडा यांना फटकारले. व्यासपीठावर जाण्याअगोदर सोनिया यांनी राजीव गौडा यांना सुनावले. यावेळी गौडा यांनी सोनियांना समजवण्याचा प्रयत्न केला तरीही सोनिया गांधी संतुष्ट झाल्या नाहीत. पूर्ण कार्यक्रमादरम्यान सोनिया गांधी यांनी मौन बाळगलं. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थितांना सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता असं सांगितल्यावर सोनिया यांनी प्रश्न घेणे टाळले. 

न्याय योजना, रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य या पाच मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार करण्यात आल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी कालच्या कार्यक्रमातून  दिली होती. मात्र या जाहीरनाम्यात देशद्रोहाचं कलम वगळण्याच्या काँग्रेसच्या आश्वासनावर भाजपाने काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.  


 

Web Title: Sonia Gandhi Not happy with Congress' manifesto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.