राजदच्या भाजपाविरोधी रॅलीत सोनिया गांधी व मायावती राहणार गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 08:46 AM2017-08-24T08:46:32+5:302017-08-24T09:02:42+5:30

बिहारच्या पाटणा शहरातील गांधी मैदानात रविवारी राष्ट्रीय जनता दलातर्फे ‘भाजपा भगाओ, देश बचाओ’ रॅली काढली जाणार आहे.

Sonia Gandhi and Mayawati remain absent from RJD's anti-BJP rally | राजदच्या भाजपाविरोधी रॅलीत सोनिया गांधी व मायावती राहणार गैरहजर

राजदच्या भाजपाविरोधी रॅलीत सोनिया गांधी व मायावती राहणार गैरहजर

Next
ठळक मुद्देबिहारच्या पाटणा शहरातील गांधी मैदानात रविवारी राष्ट्रीय जनता दलातर्फे ‘भाजपा भगाओ, देश बचाओ’ रॅली काढली जाणार आहे. रॅलीत बसपाच्या प्रमुख मायावती आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधीही सहभागी होऊ शकणार नाहीत. सोनिया गांधी यांच्याऐवजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे या रॅलीत सहभागी होणार आहेत.

पाटणा, दि 24-  बिहारच्या पाटणा शहरातील गांधी मैदानात रविवारी राष्ट्रीय जनता दलातर्फे ‘भाजपा भगाओ, देश बचाओ’ रॅली काढली जाणार आहे. या रॅलीत बसपाच्या प्रमुख मायावती आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधीही सहभागी होऊ शकणार नाहीत. राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. सोनिया गांधी यांच्याऐवजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे या रॅलीत सहभागी होणार आहेत. तर बसपाकडून पक्षाचे महासचिव सतीश चंद्र मिश्र या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. तसंच राहुल गांधी या रॅलीला सहभागी होणार की नाही? हे अजूनही निश्चित झालेलं नाही. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाने आयोजीत केलेल्या या रॅलीमध्ये नेमकं काय बघायला मिळणार? याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

राजदच्या या भाजराविरोधी रॅलीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह इतर विरोधी पक्ष नेते सहभागी होणार आहेत. मात्र सोनिया गांधी या रॅलीत सहभागी होऊ शकणार नाहीत, त्याचप्रमाणे बसपाच्या नेत्या मायावती यांनीही या रॅलीत सहभागी होणार नाही.

विरोधकांमध्ये एकजूट दिसलीच पाहिजे, असं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत म्हणाल्या होत्या. राजदची भाजपाविरोधी रॅली म्हणजे विरोधकांना एकत्र येण्याची एक नामी संधीच होती. पण या रॅलीतून आता दोन महत्त्वाच्या व्यक्ती कमी झाल्या आहेत. सीबीआयचे छापे पडल्यानंतर तर लालूप्रसाद यादव यांनी या रॅलीची कसून तयारी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यामागे सीबीआयच्या तपासणीचा तगादा जाणीवपूर्वक लावला आहे असाही आरोप त्यावेळी यादव यांनी केला होता. त्यानंतर ही रॅली लालूप्रसाद यादव यांनी प्रतिष्ठेची केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूरग्रस्तांबाबत काहीही सहानुभूती नाही तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते हवाई दौरे करत आहेत. अशी टीका लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. ज्या ठिकाणी रेल्वे अपघात झाले तिथे नरेंद्र मोदी का गेले नाहीत? असाही प्रश्न लालूप्रसाद यादव यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नाही तर जदयूचे प्रवक्ते हे कुत्र्यासारखे वागत आहेत, अशीही खालच्या शब्दातील टीकाही लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.

लालू प्रसाद यादव यांच्या रॅलीची तयारी; पोस्टरमध्ये तेजस्वी यादव बाहुबलीच्या वेशात
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष महारॅली २७ ऑगस्टला काढणार आहेत. या रॅलीची सध्या जोरदार तयारी सुरू असून, या रॅलीसाठी पाटण्यामध्ये विविध पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये तेजस्वी यादव यांचं ‘बाहुबली’ अवतारातील पोस्टर लावण्यात आलं आहे. पाटण्यात लावण्यात आलेल्या या पोस्टरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 
 

Web Title: Sonia Gandhi and Mayawati remain absent from RJD's anti-BJP rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.