छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षलवादी हल्ला, बीजापूर येथे आयईडी स्फोटात चार जवानांसह सहा जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 11:02 AM2018-11-14T11:02:16+5:302018-11-14T11:10:33+5:30

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेत अडथळे आणण्यासाठी माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया करण्यात येत आहेत.

Six people including four jawans injured in Chhattisgarh's Naxal attack, IED blast at Bijapur | छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षलवादी हल्ला, बीजापूर येथे आयईडी स्फोटात चार जवानांसह सहा जण जखमी 

छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षलवादी हल्ला, बीजापूर येथे आयईडी स्फोटात चार जवानांसह सहा जण जखमी 

ठळक मुद्देछत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेत अडथळे आणण्यासाठी माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया करण्यात येत आहेतबुधवारी सकाळी बीजापूर येथे माओवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून केलेल्या मोठ्या हल्ल्यात बीएसएफच्या चार जवानांसह सहा जण जखमी झाले

रायपूर - छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेत अडथळे आणण्यासाठी माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया करण्यात येत आहेत.  बुधवारी सकाळी बीजापूर येथे माओवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून केलेल्या मोठ्या हल्ल्यात बीएसएफच्या चार जवानांसह सहा जण जखमी झाले आहेत. तसेच एक डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड आणि एक नागरिकही या हल्ल्यात जखमी झाला आहे. या परिसरात सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील बीजापूरपासून सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या बीजापूर घट्टी येथे आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटात सीमा सुरक्षा दलाचे चार जवान जखमी झाले. तसेच एक डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड आणि एक नागरिकही जखमी झाला. स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




दरम्यान, नक्षलविरोधी ऑपरेशनचे डीआयजी पी. सुंदरराज यांनी या हल्ल्ल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, ''सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये अद्याप गोळीबार सुरू आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे. सध्या छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. तसेच पहिल्या फेरीमध्ये नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हिंसक कारवायांना धुडकावून लावत सर्वसामान्य  मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले होते.  



 

Web Title: Six people including four jawans injured in Chhattisgarh's Naxal attack, IED blast at Bijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.