धक्कादायक ! आईची हत्या करून त्याने पिले रक्त, मांत्रिक मुलगा फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 07:45 AM2019-01-07T07:45:08+5:302019-01-07T07:45:42+5:30

मांत्रिक मुलगा फरार; छत्तीसगडमधील थरकाप उडविणारी घटना

Shocking After killing his mother, he escaped with pimed blood, psychic son | धक्कादायक ! आईची हत्या करून त्याने पिले रक्त, मांत्रिक मुलगा फरार

धक्कादायक ! आईची हत्या करून त्याने पिले रक्त, मांत्रिक मुलगा फरार

Next

रायपूर : एका मांत्रिक मुलाने आपल्या आईचीच हत्या केली. त्यानंतर तो तिच्या शरीरातील रक्त पीत होता. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात नववर्षाच्या आदल्या दिवशी घडली. हे भीषण दृश्य पाहणाऱ्या महिलेला बसलेल्या मानसिक धक्क्यानंतर ती त्यातून तीन दिवस सावरू शकली नव्हती. त्यानंतर तिने पोलिसांना हा प्रकार कळविला. पोलीस शुक्रवारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत दिलीप यादव या मुलाने आपल्या आईच्या मृतदेहाचे तुकडे करून ते जाळूनही टाकले होते.

सध्या फरारी असलेल्या दिलीपने आणखी कोणाला इजा करण्याच्या आधीच त्याला अटक करण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत. ज्या गावात ही घटना घडली तेथील रहिवाशांनी सांगितले की, मांत्रिक असलेला दिलीप नेहमी माणसाचा बळी देण्याची भाषा करीत असे. तो आपल्या आईचा चेटकीण म्हणून उल्लेख करायचा. तिच्यामुळे आपले वडील व भाऊ मरण पावल्याचाही तो आरोप करीत असे.

मृतदेहाची राख, जळालेली हाडे केली जप्त
च्दिलीपने आईची हत्या करून तिचे रक्त पीत असल्याचे रामकचर गावातील समिरन यादवने पाहिले होते. तिने गुरुवारी रात्री चैतमा पोलीस ठाण्यात याबद्दलची माहिती दिली. सुमारिया या ५० वर्षे वयाच्या व शेजारीच राहत असलेल्या महिलेला भेटायला ती ३१ डिसेंबरच्या सकाळी गेली. तिच्या घरातून समिरनला विचित्र आवाज ऐकू आले. दिलीपने आपली आई सुमारियाच्या मान, डोके व छातीवर कुºहाडीने वार करून तिला ठार मारले. त्यानंतर तिच्या जखमेतून वाहणारे रक्त तो प्यायला लागला.

च्हे दृश्य पाहून समिरनची बोबडीच वळली व थरथरू लागली. तिने कसाबसा तिथून काढता पाय घेतला व आपल्या घरी गेली. ही घटना कोणालाही सांगायची तिची हिंमत झाली नाही. दोन-तीन दिवसांनंतर तिने ही घटना आपल्या सासºयांना सांगितली.
च्सरपंचाबरोबर चर्चा केल्यानंतर हा प्रकार पोलिसांना कळविण्यात आला. दिलीपच्या घरी पोलिसांनी जाऊन सुमारियाच्या मृतदेहाची राख, जळालेली हाडे जप्त केली.

Web Title: Shocking After killing his mother, he escaped with pimed blood, psychic son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून