‘शिव हेच ब्रह्मांड’; मानसरोवर यात्रेत राहुल गांधी चालले ३४ किमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 05:37 AM2018-09-08T05:37:03+5:302018-09-08T05:37:27+5:30

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मानसरोवर यात्रेचे छायाचित्र प्रसिद्ध करत यात्रेत ते ३४ किमी पायी चालले, असे काँग्रेसने म्हटले आहे.

'Shiva is Universe'; Rahul Gandhi is 34 km away from Manasarovar | ‘शिव हेच ब्रह्मांड’; मानसरोवर यात्रेत राहुल गांधी चालले ३४ किमी

‘शिव हेच ब्रह्मांड’; मानसरोवर यात्रेत राहुल गांधी चालले ३४ किमी

Next

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मानसरोवर यात्रेचे छायाचित्र प्रसिद्ध करत यात्रेत ते ३४ किमी पायी चालले, असे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसने राहुल गांधी यांचा कैलाश पर्वतासमोरचा स्मित करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. ते ४६३ मिनिटांत ३४.१ किमी चालल्याने त्यांच्या ४,४६६ कॅलरीज बर्न झाल्या. टीकाकारांना मागे टाकत राहुल गांधी यांनी हा प्रवास केला. आपण हे करू शकता का? असा काँग्रेसने केला आहे.
राहुल यांनी १८ सेकंदाचा व्हिडीओ शेअर करून ‘शिव हेच ब्रह्मांड’ असल्याचे म्हटले आहे. त्यांची आणखीही छायाचित्रे दिसत असून, यात ते यात्रेकरूंसोबत बोलत आहेत. ते ३१ आॅगस्ट रोजी यात्रेसाठी नेपाळकडे रवाना झाले होते व तेथून त्यांनी पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले होते.

Web Title: 'Shiva is Universe'; Rahul Gandhi is 34 km away from Manasarovar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.