'त्या ठिकाणी मशिदच बनणार, कोणासाठीच जागा नाही सोडणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 09:13 PM2017-08-18T21:13:57+5:302017-08-18T21:18:39+5:30

मशिदीच्या जागेवर फक्त मशिदच बांधली जाईल, जे लोक राम मंदिरासाठी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून द्यावा असं सांगत आहेत त्यांनी यासाठी स्वतःची संपत्ती दान करावी...

Shia cleric kalbe jawad says babri mosque cannot be relocated nor its land be used | 'त्या ठिकाणी मशिदच बनणार, कोणासाठीच जागा नाही सोडणार'

'त्या ठिकाणी मशिदच बनणार, कोणासाठीच जागा नाही सोडणार'

Next
ठळक मुद्देमशिदीच्या जागेवर फक्त मशिदच बांधली जाईल जे लोक राम मंदिरासाठी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून द्यावा असं सांगत आहेत त्यांनी यासाठी स्वतःची संपत्ती दान करावी

लखनऊ, दि. 18 - मशिदीच्या जागेवर फक्त मशिदच बांधली जाईल असं विधान रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादावर  शिया मुस्लिमांचे धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाद यांनी केलं आहे. जे लोक राम मंदिरासाठी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून द्यावा असं सांगत आहेत त्यांनी यासाठी स्वतःची संपत्ती दान करावी असं मजलिस-ए-उलेमा-ए-हिंदचे महासचिव कल्बे जव्वाद म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वी अयोध्या येथील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुस्लीम समाजाच्या बाजूने लागला, तरी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून देऊन लाखो देशवासीयांची मने जिंकावीत, असे आवाहन शिया मुस्लिमांचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक यांनी केले होते. 

सादिक यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना कल्बे जव्वाद म्हणाले, जे लोकं राम मंदिरासाठी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून द्यावा असं सांगत आहेत त्यांना स्वतःची जमीन देण्याचा अधिकार आहे. मशिदिसाठीच्या जमिनीबाबत ते अशी घोषणा करू शकत नाहीत. जी गोष्ट तुमची नाहीये त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये.  त्या जागेवरील आपला दावा सोडून द्या असं सांगणा-यांनी यासाठी स्वतःचं घर आणि संपत्ती दान करावी असं ते म्हणाले. एनबीटीने याबाबत वृत्त दिलं आहे.  

काय म्हणाले होते मुस्लिमांचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक -
अयोध्या येथील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुस्लीम समाजाच्या बाजूने लागला, तरी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून देऊन लाखो देशवासीयांची मने जिंकावीत, असे आवाहन शिया मुस्लिमांचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक यांनी रविवारी येथे केले.
वरळी येथील ‘नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडिया’ येथे ‘अहिंसा विश्व भारती’ या संस्थेतर्फे आयोजित ‘जागतिक शांतता परिषदेत’ ते बोलत होते. अयोध्येतील हा वाद हिंदू व मुस्लीम परस्पर सन्मानाने सोडविण्यावर भर देत, कल्बे सादिक यांनी त्या दृष्टीने शिया समुदायातर्फे हे सलोख्याचे पाऊल टाकले.
मौलाना कल्बे सादिक म्हणाले की, रामजन्मभूमी-बाबरी मशिदीचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात असून, न्यायालयावर आमचा विश्वास आहे. न्यायालयाचा निकाल मुस्लीम समाजाच्या विरोधात गेला, तरी त्यांनी तो शांततेने मान्य करावा. आपल्या या मताला इस्लामी धर्मशास्त्राचा दाखला देत, कल्बे सादिक म्हणाले की, जो मनापासून दान करतो, त्याला अल्ला काही कमी पडू देत नाही. त्यामुळे सर्वात प्राणप्रिय अशी वस्तू दिल्याने देणा-याला त्याच्या हजारपटीने परत मिळते. मौलाना कल्बे सादिक शिया पंथियांच्या ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्षही आहेत.

Web Title: Shia cleric kalbe jawad says babri mosque cannot be relocated nor its land be used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.