उत्तरपत्रिकेत शायरी, विनोद, दोहे आणि सोबत नोटाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 03:42 AM2018-04-12T03:42:38+5:302018-04-12T03:42:38+5:30

परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्याने लिहिणे अपेक्षित असते. मात्र, हरयाणामध्ये १० व १२वीच्या परीक्षांमध्ये काही विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे उत्तर म्हणून चक्क शायरी, विनोद, दोहे असे बरेच काही लिहिले आहेत.

Shayari, Vinod, Doha, and Notary in answer sheet! | उत्तरपत्रिकेत शायरी, विनोद, दोहे आणि सोबत नोटाही!

उत्तरपत्रिकेत शायरी, विनोद, दोहे आणि सोबत नोटाही!

googlenewsNext

नवी दिल्ली : परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्याने लिहिणे अपेक्षित असते. मात्र, हरयाणामध्ये १० व १२वीच्या परीक्षांमध्ये काही विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे उत्तर म्हणून चक्क शायरी, विनोद, दोहे असे बरेच काही लिहिले आहेत. काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांना खूश करण्यासाठी चक्क उत्तरपत्रिकेत १०० व २०० रुपयांच्या जोडल्या होत्या.
जर आम्हाला उत्तम गुण दिलेत, तर तुम्हाला पार्टी देऊ, असे आश्वासन काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका तपासणाºयांना दिले आहे. उत्तराच्या जागी या साºया गोष्टी लिहिलेल्या पाहून शिक्षकही चक्रावले आहेत. हिंदी, इंग्रजी, गणित या
विषयांच्या उत्तरपत्रिका गुरगावमधील चार केंद्रांवर तपासल्या जात असून, त्यात या गंमतीशीर गोष्टी समोर आल्या आहेत.
उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या हास्यास्पद उत्तरांमुळे हरयाणातील शिक्षकांची खूप करमणूक झाली आहे. मात्र, या मुलांच्या भविष्याविषयी त्यांना चिंताही वाटत आहे. उत्तर प्रदेशमधील परीक्षांमध्येही विद्यार्थ्यांनी अशी गंमतीदार उत्तरे लिहिण्याच्या घटना अलीकडेच घडल्या होत्या.
>एकेक भन्नाट कल्पना; शिक्षकाने मात्र दिले शून्य गुण
खांडसा येथील विज्ञानशिक्षक योगेश म्हणाले की, एका विद्यार्थ्याने उत्तराच्या जागी गालिबचा शेर लिहिला आहे. जेकबपुरातील शिक्षिका दीपा म्हणाल्या की, जर इंग्रजीत उत्तीर्ण केलेत तर शिक्षकाला पार्टी व ६०० रुपये बक्षीस मिळेल, असे लिहिले आहे.बासई येथील शिक्षक अशोककुमार यांनी सांगितलेला किस्सा भन्नाट आहे. एका विद्यार्थ्याने ३० प्रश्नांचे उत्तर एका शायरीतून दिले आहे. साहजिकच, या मुलाला मी शून्य गुण दिले आहेत.अजून एका मुलाने उत्तरपत्रिकेत ती तपासणाºयाला उद्देशून लिहिले आहे की, ‘सर मला माफ करा. मी परीक्षेत नापास होणार असे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मी दडपणाखाली असून, जर तुम्ही मला उत्तीर्ण केलेत तर तुमचा मी ऋणी असेन.’

Web Title: Shayari, Vinod, Doha, and Notary in answer sheet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.