तुरुंगातून शशिकला गेल्या आमदाराच्या घरी; डी. रूपा यांचा दावा, एसीबीकडे व्हिडिओसह दिला पुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:26 AM2017-08-24T00:26:02+5:302017-08-24T00:26:07+5:30

अण्णा द्रमुकच्या अद्याप सरचिटणीस असलेल्या शशिकला यांची तुरुंगातही कशी शाही बडदास्त ठेवली जाते, याच गौप्यस्फोट करणा-या पोलिस उपमहानिरीक्षक डी. रुपा यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) सादर केलेल्या अहवालात तुरुंग प्रशासनावर आणखी एक तोफगोळा डागला आहे.

Shashiq from prison, at the last maid's home; D. Rupa's assertion, proof given with ACB video | तुरुंगातून शशिकला गेल्या आमदाराच्या घरी; डी. रूपा यांचा दावा, एसीबीकडे व्हिडिओसह दिला पुरावा

तुरुंगातून शशिकला गेल्या आमदाराच्या घरी; डी. रूपा यांचा दावा, एसीबीकडे व्हिडिओसह दिला पुरावा

googlenewsNext

बंगळुरू : अण्णा द्रमुकच्या अद्याप सरचिटणीस असलेल्या शशिकला यांची तुरुंगातही कशी शाही बडदास्त ठेवली जाते, याच गौप्यस्फोट करणा-या पोलिस उपमहानिरीक्षक डी. रुपा यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) सादर केलेल्या अहवालात तुरुंग प्रशासनावर आणखी एक तोफगोळा डागला आहे. तुरुंगात असतानाही शशिकला या पक्षाचे होसूर येथील आमदाराच्या घरी गेल्या होत्या, याचा पुरावाच डी. रूपा यांनी सादर केला आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शशिकला सध्या तुरुंगवासात आहेत. असे असतांनाही त्यांना विशेष वागणूक दिली जात असून खास सोयी-सवलतींचा त्या उपभोग घेत आहेत, याचा पर्दाफाश करणाºया
डी . रूपा यांनी आधी केला होताच. त्यांनी शनिवारी एसीबीला सादर केलेल्या अहवालात शशिकला या बंगळुरातील मध्यवर्ती कारागृहातून होसूरच्या आमदाराच्या घरी गेल्या होत्या, असा दावा केला. याबाबत माझ्याकडे विश्वसनीय माहिती
आहे.
तुंरुगातील प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमरे आणि प्रवेशद्वार एक आणि दोन यामध्ये लावण्यात आलेल्या कॅमेºयातील फुटेजवरून याचा उलगडा करता येऊ
शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

गणवेशही घालत नाहीत...
डी. रूपा यांनी म्हटले आहे की, कर्नाटकातील सर्व तुरुंगात कैद्यांना पांढरा गणवेश परिधान करावा लागतो आणि त्यावर कैदी क्रमांक असतो. तथापि, शशिकला आणि
ईलावरासी या दोघीं मात्र साडी, सलवार-कमीजसह आवडीच्या कपड्यात वावरतात.

शशिकला यांना आरामदायी अंथरुण-पांघरुणासह पलंग देण्यात आला आहे. ही बाब न्यायालयाच्या निदर्शन आणून देण्यात आलेली नाही. वैद्यकीय कारणांस्तव अशा सुविधा त्यांना देण्यात आल्या असल्या तरी त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात आलेली नाही.

एका व्हिडिओमध्ये शशिकला सूती नाईटीत दिसतात. चार व्हिडीओ क्लीपपैकी २५ सेकंदाच्या एक व्हिडिओ फितीत त्या बाहेरून तुरुंगात प्रवेश करतांना दिसतात. सोबत बॅगही दिसते. राज्याचे गृह सचिव आणि गृहमंत्री यांची तुरुंग प्रशासाने दिशाभूल केली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Web Title: Shashiq from prison, at the last maid's home; D. Rupa's assertion, proof given with ACB video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.