दिल्लीतील प्रदूषणावरुन सुप्रीम कोर्टाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला फटकारले 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 05:27 PM2018-10-29T17:27:09+5:302018-10-29T17:28:35+5:30

दिल्लीतील प्रदूषणावरुन सुप्रीम कोर्टाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला सोशल मीडियावर अकाउंट सुरु करण्याचा आदेश दिला आहे. 

SC asks CPCB to make social media account on which citizens can complain about pollution in Delhi | दिल्लीतील प्रदूषणावरुन सुप्रीम कोर्टाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला फटकारले 

दिल्लीतील प्रदूषणावरुन सुप्रीम कोर्टाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला फटकारले 

Next

नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषणावरुन सुप्रीम कोर्टाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला सोशल मीडियावर अकाउंट सुरु करण्याचा आदेश दिला आहे. 

दिल्लीतील प्रदूषणाबाबत नागरिक तक्रार करु शकतील, यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने लवकरात लवकर सोशल मीडिया अकाउंट सुरु करावे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. तसेच, 10 वर्षे जुन्या डिझेलच्या आणि 15 वर्षे जुन्या पेट्रोलच्या वाहनांवर बंदी घालण्यास आणि आपल्या संकेतस्थळावर जुन्या वाहनांची यादी अपलोड करण्यास सुप्रीम कोर्टाने दिल्ली परिवहन विभागाला सांगितले आहे. याचबरोबर, दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणावर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. 



 

धुके आणि धुळीमुळे रहिवासी हैराण...
शहरातील वाढते प्रदूषण चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषत: मागील काही दिवसांपासून वायुप्रदूषणात वाढ झाली आहे. हवेतील धुळीचे प्रमाण वाढले आहे. सकाळच्या वातावरणात धुके आणि धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. 
 

Web Title: SC asks CPCB to make social media account on which citizens can complain about pollution in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.