रोहितची आत्महत्या वैयक्तिक कारणांमुळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 04:28 AM2017-08-17T04:28:21+5:302017-08-17T04:28:23+5:30

हैदराबाद विद्यापीठात शिकणा-या विद्यार्थी रोहित वेमुला याने वैयक्तिक कारणास्तव आत्महत्या केली

Rohit's suicide is due to personal reasons | रोहितची आत्महत्या वैयक्तिक कारणांमुळेच

रोहितची आत्महत्या वैयक्तिक कारणांमुळेच

Next

नवी दिल्ली : हैदराबाद विद्यापीठात शिकणा-या विद्यार्थी रोहित वेमुला याने वैयक्तिक कारणास्तव आत्महत्या केली, असे न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात म्हटले आहे. तो दलितही नव्हता, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
रोहित व त्याच्या मित्रांना वसतिगृहातून काढून टाकल्याने तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला. या आरोपांमध्येही तथ्य नसल्याचे समितीचे म्हणणे आहे. रोहितने १७ जानेवारी २०१६ रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर मोठे आंदोलन पेटले.
रोहित समस्यांमुळे त्रासलेला होता. त्याला अनेक समस्या होत्या व जगातील अनेक घडामोडींवर तो नाराज होता हे रोहित वेमुलाच्या सुसाइड नोटमधून हे स्पष्ट होते. त्याने सुसाइड नोटमध्ये आत्महत्येसाठी कोणालाही दोषी ठरवले नव्हते, असे समितीने म्हटले आहे.

Web Title: Rohit's suicide is due to personal reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.