सत्ताधारी नगरसेवकांचाच करवाढीला विरोध

By Admin | Published: February 14, 2015 01:07 AM2015-02-14T01:07:11+5:302015-02-14T01:07:11+5:30

Resistance to taxpayers of ruling corporators | सत्ताधारी नगरसेवकांचाच करवाढीला विरोध

सत्ताधारी नगरसेवकांचाच करवाढीला विरोध

googlenewsNext
>महापालिका : आमसभेत विरोधकही होणार आक्रमक
नागपूर : महापालिका प्रशासनाचा मालमत्ता करात वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु भाजप नेतृत्वातील सत्ताधारी नागपूर शहर विकास आघाडीच्या काही नगरसेवकांनीच याला विरोध दर्शविला आहे. विरोधी पक्षानेही आक्रमक भूमिका घेतली असल्याने सोमवारी होणारी मनपाची आमसभा चांगलीच वादळी होण्याचे संकेत आहे.
आमसभेच्या अजेेंड्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सत्तापक्षाची बैठक घेण्यात आली. सामान्य करात ४ ते १२ टक्के वाढ प्रस्तावित आहे. मलजल, पाणी तसेच रस्ता करात ३ टक्के वाढ करण्याचा विचार आहे. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात ही वाढ प्रस्तावित आहे. कर वसुली व संकलन समितीने करवाढीचा हा प्रस्ताव दिला आहे. स्थायी समितीने या आधीच याला मंजुरी दिली असल्याने मंजुरीसाठी तो सभागृहात ठेवला जाणार आहे.
याच मुद्यावरुन विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रस्तावित करवाढ मागे घेण्याचा प्रस्ताव काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. मनपा कायद्यानुसार दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात याबाबत निर्णय घेतला जातो. कारण एप्रिल महिन्यापासून नवीन करवाढ लागू केली जाते.
प्रस्तावित करवाढीमुळे नागरिकांतही असंतोष असल्याने यात बदल करण्याचा पदाधिकाऱ्यांचा विचार असल्याची माहिती काही नगरसेवकांनी दिली.(प्रतिनिधी)

Web Title: Resistance to taxpayers of ruling corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.