राजीव धवन सोडणार वकिली; सरन्यायाधीशांना पत्र, फटकारल्याने घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:28 PM2017-12-11T23:28:56+5:302017-12-11T23:29:21+5:30

एक-दुस-याविरुद्ध तावातावाने युक्तिवाद करीत न्यायाधीशांना धमकावण्याच्या प्रकरणावरुन वकिलांना सरन्यायाधीशांनी फटकारल्याने सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील राजीव धवन यांनी वकिली व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Rajiv Dhawan quit the legal profession; Letter to the Chief Justices, the decision taken by reprimand | राजीव धवन सोडणार वकिली; सरन्यायाधीशांना पत्र, फटकारल्याने घेतला निर्णय

राजीव धवन सोडणार वकिली; सरन्यायाधीशांना पत्र, फटकारल्याने घेतला निर्णय

googlenewsNext

नवी दिल्ली : एक-दुस-याविरुद्ध तावातावाने युक्तिवाद करीत न्यायाधीशांना धमकावण्याच्या प्रकरणावरुन वकिलांना सरन्यायाधीशांनी फटकारल्याने सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील राजीव धवन यांनी वकिली व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पाठविलेल्या पत्रात धवन यांनी गंभीर आरोप केले आहेत. एका प्रकरणाच्या सुनावणीत धवन वा सरन्यायाधीशांत खडाजंगी झाली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने असे प्रकारचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत फटकारले होते.
धवन यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयात कधीच अशा प्रसंगाला मला सामोरे जावे लागले नाही. या अपमानानंतर मी वकिली सोडण्याचे ठरविले आहे. आजवरच्या कारकीर्दीत केलेल्या सेवेची आठवण सदैव आपल्यासह राहतील. वरिष्ठ वकिलाने वकिली सोडण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ असेल.

Web Title: Rajiv Dhawan quit the legal profession; Letter to the Chief Justices, the decision taken by reprimand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.