भ्रष्टाचारावर चौकीदार गप्प का? - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 06:03 PM2018-11-10T18:03:19+5:302018-11-10T18:21:08+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी छत्तीसगडमधील कांकेर येथे प्रचारसभा घेतली. भ्रष्टाचार, बेरोजगारी यावरुन राहुल गांधींनी सभेत मोदी सरकार आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

rahul gandhi chhattisgarh election 2018 kanker rally slams raman singh narendra modi panama case | भ्रष्टाचारावर चौकीदार गप्प का? - राहुल गांधी

भ्रष्टाचारावर चौकीदार गप्प का? - राहुल गांधी

Next

रायपूर - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी (10 नोव्हेंबर) छत्तीसगडमधील कांकेर येथे प्रचारसभा घेतली. भ्रष्टाचार, बेरोजगारी यावरुन राहुल गांधींनी सभेत मोदी सरकार आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रमण सिंह हे भ्रष्ट मुख्यमंत्री असून त्यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्स प्रकरणात आले होते. पाकिस्तानमध्ये पनामा पेपर्स प्रकरणात नाव आल्याने पंतप्रधानांनाही तुरुंगात जावे लागले. मात्र छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांच्या मुलावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचं राहुल यांनी सांगितलं. 



राहुल यांनी पीडीएस घोटाळ्यावरून रमण सिंह यांच्यावर टीका केली. पीडीएस घोटाळ्यातील नोंद वहीत मुख्यमंत्र्यांनी मॅडम आणि डॉक्टर साहेबांना पैसे दिल्याचा उल्लेख होता. हे दोघे कोण आहेत, हे रमण सिंह यांनी जनतेला सांगावे, असे आव्हानच त्यांनी दिले.



कांकेरमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ही टीका केली आहे. देशाचे चौकीदार भ्रष्टाचार, बेरोजगारी, नोटाबंदी अशा कोणत्याही विषयावर बोलत नसल्याचही त्यांनी म्हटलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री रमण सिंह यांनी छत्तीसगडमधील तरुणांना रोजगाराचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात स्थानिकांना रोजगार मिळाला नसल्याचीही माहिती दिली. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाईल असेही राहुल गांधी यांनी सांगितलं. 





 

Web Title: rahul gandhi chhattisgarh election 2018 kanker rally slams raman singh narendra modi panama case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.