राहुल गांधी पुन्हा सुट्टीवर

By admin | Published: June 20, 2016 10:03 AM2016-06-20T10:03:15+5:302016-06-20T10:23:58+5:30

काही दिवसांसाठी देशाबाहेर चाललो असून ही छोटी भेट असणार आहे अशी माहिती राहुल गांधींनी ट्विटवरुन दिली आहे

Rahul Gandhi again on vacation | राहुल गांधी पुन्हा सुट्टीवर

राहुल गांधी पुन्हा सुट्टीवर

Next
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 20 -  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा सुट्टीवर चालले असून ट्विट करुन त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. काही दिवसांसाठी देशाबाहेर चाललो असून ही छोटी भेट असणार आहे अशी माहिती ट्विटवरुन देण्यात आली आहे. मात्र नेमके कुठे जाणार आहेत याचा खुलासा करण्यात आलेला नाही. 
 
'काही दिवसांसाठी देशाबाहेर चाललो असून ही छोटी भेट असणार आहे. ज्यांनी माझी काल भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे धन्यवाद', असं ट्विट करण्यात आलं आहे. राहुल गांधी याअगोदर परदेश दौ-यावर गेले असताना ते कुठे गेले आहेत ? यावरुन विरोधकांनी जोरदार टीका केली होती. राहुल गांधींच्या अज्ञातवासामुळे काँग्रेस पक्षाचीही कोंडी झाली होती. त्यामुळे यावेळी त्यांनी ट्विटवरुन आपण देशाबाहेर चाललो असल्याची माहिती दिली असल्याची शक्यता आहे.
 

Web Title: Rahul Gandhi again on vacation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.