'नरेंद्र मोदी हे 'मेघनाद'; अरुण जेटलींच्या मागे लपत आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 05:17 PM2019-01-02T17:17:58+5:302019-01-02T17:19:16+5:30

तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय यांनी राफेल करारावरून मोदींवर निशाणा साधला आहे.

Rafale Deal : 'Narendra Modi is Meghnad'; he is hiding Arun Jaitley behind ' by Saugata Roy | 'नरेंद्र मोदी हे 'मेघनाद'; अरुण जेटलींच्या मागे लपत आहेत'

'नरेंद्र मोदी हे 'मेघनाद'; अरुण जेटलींच्या मागे लपत आहेत'

googlenewsNext
ठळक मुद्दे तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय यांनी राफेल करारावरून मोदींवर निशाणा साधलाभाजपाला राफेल करारावर बोलण्यासाठी राज्यसभेचा सदस्य सापडला. नरेंद्र मोदी हे रामायण काळातील मेघनाद आहेत.

नवी दिल्ली- तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय यांनी राफेल करारावरून मोदींवर निशाणा साधला आहे. भाजपाला राफेल करारावर बोलण्यासाठी राज्यसभेचा सदस्य सापडला. लोकसभेत 300 खासदार असूनही राज्यसभेतला माणूस इथे येऊन मोदी सरकारची बाजू मांडत आहे. विशेष म्हणजे राज्यसभेचे सदस्य असलेले अरुण जेटली हे संरक्षण मंत्रीदेखील नाहीत. तरीही स्वतःला ते राफेल करारातील तज्ज्ञ समजतात.

आमच्या पक्षाला जेटलींसारखं तूतू-मैं मैंमध्ये अडकून पडायचं नाही. खरं तर नरेंद्र मोदी हे रामायण काळातील मेघनाद आहेत. त्यामुळेच ते अरुण जेटलींच्या मागे लपत आहेत. नरेंद्र मोदींनी संसदेचा सामना करण्याची हिंमत दाखवावी, जेपीसी गठीत करून संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या राफेल कराराची चौकशी केली पाहिजे.


सरकारनं या करारात विमानांच्या किमती का वाढवल्यात ते समोर आलं पाहिजे. तसेच राफेल करारासाठी एचएएलऐवजी एका खासगी कंपनीला ऑफसेट भागीदार का बनवण्यात आलं, याचंही भाजपानं उत्तर द्यावं, असं सौगत म्हणाले आहेत.



 

Web Title: Rafale Deal : 'Narendra Modi is Meghnad'; he is hiding Arun Jaitley behind ' by Saugata Roy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.