Punjab Election 2022: भाजपवाल्या 'द ग्रेट खली'च्या खास गोष्टी, पत्नी अन् डाएटची इत्यंभूत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 08:11 AM2022-02-11T08:11:24+5:302022-02-11T10:07:25+5:30

Punjab Election 2022: दलिप सिंह राणा यानं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. खली उर्फ दलिप सिंग राणा हे आतापर्यंत WWF मध्ये भारतातील सर्वात मोठं नाव आहे

Punjab Election 2022: Highlights from 'The Great Khali', know the wife of khali wrestler who join bjp | Punjab Election 2022: भाजपवाल्या 'द ग्रेट खली'च्या खास गोष्टी, पत्नी अन् डाएटची इत्यंभूत माहिती

Punjab Election 2022: भाजपवाल्या 'द ग्रेट खली'च्या खास गोष्टी, पत्नी अन् डाएटची इत्यंभूत माहिती

googlenewsNext

Punjab Election 2022 The Greate Khali: पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर WWE सारख्या इंटरनॅशनल फाईटद्वारे आपली ओळख निर्माण करणाऱ्या ग्रेट खली ​(The Great Khali) उर्फ ​दलिप सिंग राणा यानं भाजपमध्ये प्रवेश केला. दिलिप सिंग राणा यानं यापूर्वी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या प्रचारातही भाग घेतला होता. खलीच्या राजकीय प्रवेशामुळे द ग्रेट खली पुन्हा चर्चेत आला आहे. WWE चं रिंगण असो, खलीची जाहिरात असो किंवा राजकारण खलीचा ठळकपणा लगेचच जाणवतो. आता, खलीच्या खासगी जीवनाबद्दल आपण माहिती घेऊया. 

दलिप सिंह राणा यानं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. खली उर्फ दलिप सिंग राणा हे आतापर्यंत WWF मध्ये भारतातील सर्वात मोठं नाव आहे. खलीने या खेळात असताना सर्व प्रमुख चॅम्पियनशिप जिंकल्या. अंडरटेकर, जॉनसिना, केन यांसारख्या दिग्गजांसोबत फाईट केल्या आहेत. या खेळात हेवीवेट टायटल आपल्या नावे करणारा खली हा भारताचा एकमेव खेळाडू आहे. दरम्यान, गेल्या काही काळापासून तो डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगणापासून लांब आहे. 

खलीची पत्नी

खलीच्या पत्नीचं नाव हरमिंदर कौर असून ती जालंधरच्या नूरमहल येथील रहिवाशी आहे. सन 2002 मध्ये खलीचं लग्न झालं, त्यानंतर त्याने WWE मध्ये प्रवेश केला. हरमिंदरने दिल्ली विश्व-विद्यालयातून आपलं ग्रॅज्यूएशन पूर्ण केलंय. खली आणि त्याच्या पत्नीमध्ये वय, उची आणि वजनाचं शारिरीक अंतर मोठं आहे. मात्र, दोघांचं बॉन्डिंग चांगलं असून एकमेकांवर खूप प्रेम आहे. 

खलीचं लग्न 2002 मध्ये झालं, पण त्यांच्या मुलीचा जन्म लग्नाच्या 12 वर्षानंतर म्हणजे 2014 मध्ये झाला. त्यांच्या मुलीचं नाव अवलीन राणा असून ती सध्या 8 वर्षांची आहे. हरमिंदर कौर आपल्या पतीप्रमाणेच मुलीलाही रेसलर बनवून इच्छिते. खलीने अनेकदा मुलीसोबतचे फोटो इंस्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. आपल्या कुटुंबाला घेऊन गर्दीच्या ठिकाणी जाणं खली टाळतात. कारण, कुटुंबीयांना आपल्या स्टारडमचा त्रास होऊ नये, ही त्यांची भावना असते.

5 किलो चिकन खातात

खलीच्या भारदस्त शरीरामुळे त्याच्या खाण्याचा अंदाज लावणं कठीण आहे. खलीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होती की, ते दररोज 5 किलो चिकन खातात, 55 अंडी आणि 10 लिटर दूधही त्यांच्या आहारात असते. चीट डे दिवशी ते कमीत-कमी 60 ते 70 भुटरे खाऊ शकतो. जेवणात चिकनकरी आणि अंडाकरी अधिक पसंत करतात. विशेष म्हणजे खली स्वत:ही चविष्ट जेवण बनवतात. 

खलीची शरीरयष्टी 

खलीची हाईट 7 फूट 1 इंच एवढी असून त्यांच वजन 150 ते 160 किग्रॅ एवढं आहे. खलीच्या पायात 20 नंबरचा शूज बसतो. खलीला कपडे बनविण्यासाठी खास ऑर्डर द्यावी लागते, त्यांच्या वजन, उंचीनुसारचे कपडे बाजारात मिळत नाहीत. 
 

Web Title: Punjab Election 2022: Highlights from 'The Great Khali', know the wife of khali wrestler who join bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.