आचार, विचार और अब समाचार... पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पत्रकारांना स्वरचित कवितेतून संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 05:39 AM2023-12-10T05:39:16+5:302023-12-10T05:40:48+5:30

पंतप्रधानांनी शनिवारी पीटीआय या वृत्तसंस्थेच्या न्यूज रूमला भेट दिली.

Prime Minister visited PTI newsroom on Saturday | आचार, विचार और अब समाचार... पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पत्रकारांना स्वरचित कवितेतून संदेश

आचार, विचार और अब समाचार... पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पत्रकारांना स्वरचित कवितेतून संदेश

नवी दिल्ली : आचार, विचार और अब समाचार

अस्तित्व का, आत्मतत्त्व का

ऐसा संघर्ष है  जिसमे जीना भी है

और जीतना भी है

उत्तम अस्त्र, शस्त्र है

आचार और विचार 

ही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी केलेली कविता. पंतप्रधानांनी शनिवारी पीटीआय या वृत्तसंस्थेच्या न्यूज रूमला भेट दिली. तासाभराच्या भेटीनंतर मोदी यांनी वृत्तसंस्थेच्या अतिथी पुस्तिकेत ही कविता लिहिली.

ही कविता लिहिल्यानंतर मोदी यांनी पीटीआयचे सीईओ तथा एडिटर-इन-चिफ विजय जोशी यांना उद्देशून विनोदाने म्हटले की, “या ओळी तुमच्याविरुद्ध आहेत.” “याचा अर्थ काय?” अशी विचारणा जोशी यांनी त्यावर केली. तेव्हा मोदी यांनी पुस्तिका उचलून ओळी वाचून दाखवत पत्रकारांनी नीतिमूल्ये आणि वसा यावरून ढळू नये,  असे त्यांना अपेक्षित असल्याचे ठसविले.

२०१४ मध्ये पंतप्रधान बनल्यापासून मोदी यांनी पहिल्यांदाच एखाद्या वृत्तसंस्थेच्या कार्यालयास भेट दिली आहे. पीटीआयने नव्याने सुरू केलेल्या तसेच अवघ्या १० महिन्यांत लोकप्रिय झालेल्या व्हिडीओ सेवेची मोदी यांनी यावेळी कौतुकाने चौकशी केली.

Web Title: Prime Minister visited PTI newsroom on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.