Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू यांच्या विजयावर यशवंत सिन्हा यांच्या खोचक शुभेच्छा; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 08:55 PM2022-07-21T20:55:32+5:302022-07-21T20:56:53+5:30

Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत NDAच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत. त्या देशातील पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती असतील. त्यांनी विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

President Draupadi Murmu | Presidential Election 2022 | Yashwant Sinha wishes to Draupadi Murmu on her victory | Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू यांच्या विजयावर यशवंत सिन्हा यांच्या खोचक शुभेच्छा; म्हणाले...

Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू यांच्या विजयावर यशवंत सिन्हा यांच्या खोचक शुभेच्छा; म्हणाले...

googlenewsNext

President Draupadi Murmu: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू(President Draupadi Murmu) विजयी झाल्या आहेत. त्यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलैला मतदान घेण्यात आले होते. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. देशाच्या नव्या राष्ट्रपती 25 जुलै रोजी शपथ घेतील. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या यशवंत सिन्हा यांनी द्रौपदी मुर्मूचे अभिनंदन केले आहे. 

संबंधित बातमी- दोन मुले आणि पतीचा मृत्यू; नगरसेवक पदापासून सुरुवात, असा आहे द्रौपदी मुर्मूंचा संघर्षमय प्रवास

यशवंत सिन्हा म्हणाले की, 'देशातील नागरीकांचे आणि द्रौपदी मुर्मूंचे अभिनंदन करतो. भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू कोणत्याही भीती किंवा पक्षपात न करता संविधानाच्या संरक्षक म्हणून काम करतील अशी संपूर्ण देशाची अपेक्षा आहे,' असे सिन्हा म्हणाले. 

यशवंत सिन्हा पुढे म्हणाले की, 'राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा भारतीय लोकशाहीला दोन महत्त्वाच्या मार्गांनी फायदा झाला आहे. पहिला म्हणजे, या निवडणुकीऩे बहुतांश विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणले. ही खरोखरच काळाची गरज आहे. राष्ट्रपती निवडणुकीनंतरदेखील ही विरोधी एकजूट कायम ठेवण्याचे मी आवाहन करतो.'

द्रौपदी मुर्मूंना विजयाच्या शुभेच्छा द्यायला PM मोदी त्यांच्या निवासस्थानी, पाहा Video

सिन्हा पुढे म्हणाले की, 'या निवडणुकीचा दुसरा फायदा म्हणजे, माझ्या निवडणूक प्रचारादरम्यान मी देश आणि सामान्य जनतेसमोरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधकांची मते मांडण्याचा प्रयत्न केला. विशेषतः मी ईडी, सीबीआय, आयटी आणि अगदी राज्यपाल कार्यालयाच्या उघड आणि सर्रास वापराबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.'

Web Title: President Draupadi Murmu | Presidential Election 2022 | Yashwant Sinha wishes to Draupadi Murmu on her victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.