झारखंडमधल्या अल्पवयीन आदिवासी मुलींना ढकललं जातंय पोर्नोग्राफीमध्ये

By admin | Published: February 2, 2016 02:48 PM2016-02-02T14:48:52+5:302016-02-02T14:48:52+5:30

झारखंडमधल्या अल्पवयीन आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्यांना पोर्नोग्राफी करण्यासाठी भाग पाडण्यात आल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत

Pornography is being pushed to minor tribal girls in Jharkhand | झारखंडमधल्या अल्पवयीन आदिवासी मुलींना ढकललं जातंय पोर्नोग्राफीमध्ये

झारखंडमधल्या अल्पवयीन आदिवासी मुलींना ढकललं जातंय पोर्नोग्राफीमध्ये

Next
>ऑनलाइन लोकमत
रांची, दि. २ - झारखंडमधल्या अल्पवयीन आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्यांना पोर्नोग्राफी करण्यासाठी भाग पाडण्यात आल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस करत आहेत. झारखंडमधल्या अल्पवयीन आदिवासी मुलींना शहरांमध्ये घरगुती कामासाठी न्यायचे आणि नंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचे तसेच पोर्नोग्राफिक चित्रपट बनवायचे असा हा सगळा प्रकार असून त्यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तात व्यक करण्यात आला आहे.
अशा प्रकारे दरवर्षी हजारो मुलींना लैंगिक अत्याचारांची शिकार व्हावं लागतं असा आरोप सामाजिक संस्थांनी केला आहे. झारखंड पोलीसांकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार २००५ पासून आत्तापर्यंत ३,८३८ मुलं हरवली आहेत आणि त्यापैकी १,२८१ मुलांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. 
अशा दुष्टचक्रात अडकलेल्या एका मुलीने सांगितलं की तिच्यावक नवी दिल्लीत सामूहिक बलात्कार करण्यात आला, त्याचे चित्रीकरण करण्यात आले. तिघा मुलींना तर व्हॉट्स अॅपवर बोली लावून विकण्यात आल्याची घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे.
सामाजिक संस्थांच्या सांगण्यानुसार तक्रारी केल्या जात नाहीत, म्हणून खरी आकडेवारी समोर येत नाही, परंतु दरवर्षी सुमारे १० हजार मुलींना झारखंडमधून अन्य राज्यांमध्ये वेश्याव्यवसायात ढकलले जाते. 
एका प्रचंड मोठ्या रॅकेटचा काही भागच समोर आला असेल आणि प्रचंड मोठं दुष्टकांड झारखंडमधल्या गरीब आदिवासी मुलींच्या बाबतीत घडत असेल अशी भीती काहीसामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. 
इंटरनेटवरील अनेक पॉर्न साईट्सवर झारखंड मेड, झारखंड व्हिलेज गर्ल, आदिवासी व्हिलेज गर्ल अशा टॅग्जनी पोर्नो क्लिप्स उपलब्ध आहेत, याचा अर्थ आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलींना या व्यवसायात ढकलण्यात आल्याचे उघड होते असे काहींचे म्हणणे आहे. 
दलालांचे जाळे याकामी मोठ्या प्रमाणावर कार्यरत असल्याचा संशय गाझियाबादचे डेप्युटी पोलीस सुपरिटेडेंट रणविजय सिंह यांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सावळ्या वर्णाच्या मुलींच्या पोर्नोग्राफी व्हिडीयोना प्रचंड मागणी असल्यामुळे या मुलींना या व्यवसायात ढकलण्यात येत असल्याची शक्यता ऋषी कांत या सामाजिक कार्यकर्त्याने व्यक्त केली आहे. 
नोकरी देणा-या प्लेसमेंट एजन्सीज या काळ्या व्यवहारात गुंतल्याचाही संशय आहे. घरगुती कामाच्या नोकरीसाठी आलेल्या मुलींना अशा एजन्सीज फसवतात असा संशय आहे.

Web Title: Pornography is being pushed to minor tribal girls in Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.