पक्ष्यांपासून मिळालेले गुण आयुष्यभर प्रेरणादायी किशोर रिठे यांचे प्रतिपादन, विद्यार्थ्यांसाठी पक्षीमित्र संमेलन

By admin | Published: February 8, 2015 12:19 AM2015-02-08T00:19:24+5:302015-02-08T00:19:24+5:30

अकोला: पक्ष्यांचे जीवन सुखमय असते. त्यांचे अभ्यासपूर्ण निरीक्षण केले तर मानवालाही आनंददायी जीवन जगण्याची कला मिळते. पक्ष्यांच्या जीवनातून मिळालेले गुण आयुष्यातील प्रत्येक वळणावर व प्रत्येक क्षेत्रात प्रेरणादायी ठरतात, असे उद्गार राज्याचे जैवविविधता मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी ७ फेबु्रवारी रोजी आयोजित विद्यार्थ्यांच्या पक्षीमित्र संमेलनात काढले. निसर्ग क˜ा, सातपुडा फाउंडेशन व न्यू इरा हायस्कूलच्यावतीने न्यू इरा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

Poetry from birds, inspiration for inspirational Kishore Rheha, life-long meeting of children, birdmother meeting for students | पक्ष्यांपासून मिळालेले गुण आयुष्यभर प्रेरणादायी किशोर रिठे यांचे प्रतिपादन, विद्यार्थ्यांसाठी पक्षीमित्र संमेलन

पक्ष्यांपासून मिळालेले गुण आयुष्यभर प्रेरणादायी किशोर रिठे यांचे प्रतिपादन, विद्यार्थ्यांसाठी पक्षीमित्र संमेलन

Next
ोला: पक्ष्यांचे जीवन सुखमय असते. त्यांचे अभ्यासपूर्ण निरीक्षण केले तर मानवालाही आनंददायी जीवन जगण्याची कला मिळते. पक्ष्यांच्या जीवनातून मिळालेले गुण आयुष्यातील प्रत्येक वळणावर व प्रत्येक क्षेत्रात प्रेरणादायी ठरतात, असे उद्गार राज्याचे जैवविविधता मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी ७ फेबु्रवारी रोजी आयोजित विद्यार्थ्यांच्या पक्षीमित्र संमेलनात काढले. निसर्ग क˜ा, सातपुडा फाउंडेशन व न्यू इरा हायस्कूलच्यावतीने न्यू इरा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहिल कंदाडे हा विद्यार्थी होता तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे जैवविविधता मंडळाचे सदस्य किशोर रिठे, वनविभागाचे उपवनसंरक्षक लोणकर, गांेदियाचे पक्षीमित्र मुकुंद धुर्वे यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना विविध पक्ष्यांची माहिती प्रोजेक्टरद्वारे देण्यात आली. तसेच पक्षी निरीक्षण कसे करावे, याचीही माहिती देण्यात आली. यामध्ये आदर्श विद्यालय, स्वावलंबी विद्यालय, खंडेलवाल इंग्लिश स्कूल, डीएव्ही कॉन्व्हेंट, जेआरडी टाटा स्कूल, राजेश्वर कॉन्व्हेंट, न्यू इरा हायस्कूल यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमात संदीप वाघाळकर, प्रदीप शर्मा, प्रदीप कर्डीले, संतोष सहारे, संजय वाघमारे, पुरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला गौरव झटाले, विजय पवार, प्रेम अवचार, सुरज घोगरे, मनोज रूद्रकार, अजीम शेख यांनी सहकार्य केले.
निसर्ग क˜ा व स्वावलंबी इको क्लबच्यावतीने राबविण्यात आलेल्या निबंध व पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये १० शाळांमधून १० विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला. निबंध स्पर्धेत दिव्या काकडे द्वितीय तर प्राची कराळे तृतीय आली. पोस्टर प्रदर्शनात स्वावलंबी विद्यालय प्रथम आले तर खंडेलवाल विद्यालय द्वितीय व जेआरडी टाटा विद्यालय तृतीय आले.

----------------- बॉक्स --------------
निबंध स्पर्धेतील प्रथम विद्यार्थी झाला अध्यक्ष
निसर्गक˜ा व सातपुडा फाउंडेशनच्यावतीने पक्षी निरीक्षण व पक्षी संवर्धन या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या निबंध स्पर्धेतील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांला पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष बनविण्यात आले. साहिल कंदाडे हा निबंध स्पर्धेत प्रथम आल्यामुळे त्याला अध्यक्ष बनविण्यात आले.

फोटो : 08 सीटीसीएल

Web Title: Poetry from birds, inspiration for inspirational Kishore Rheha, life-long meeting of children, birdmother meeting for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.