Today's Fuel Price: इंधन दरात घट; पेट्रोल 29 पैशांनी, डिझेल 32 पैशांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 10:51 AM2018-12-29T10:51:24+5:302018-12-29T10:55:54+5:30

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 29 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 74.88 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 32 पैशांची घट झाली आहे.

petrol price today down 29 paise diesel 32 paise at lowest level in 2018 | Today's Fuel Price: इंधन दरात घट; पेट्रोल 29 पैशांनी, डिझेल 32 पैशांनी स्वस्त

Today's Fuel Price: इंधन दरात घट; पेट्रोल 29 पैशांनी, डिझेल 32 पैशांनी स्वस्त

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे.मुंबईकरांना प्रति लिटर पेट्रोलसाठी 74.88 रुपये तर प्रति लिटर डिझेलसाठी 66.24 रुपये मोजावे लागणार आहेत.राजधानी नवी दिल्लीतही पेट्रोल 29 पैशांनी तर डिझेल 30 पैशांनी स्वस्त झालं आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 29 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 74.88 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 32 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 66.24 रुपयांवर आला आहे. 

खनिज तेलाच्या दरात मोठी घट; स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल?

दिल्लीतही इंधनाचे दर घटले आहेत. दिल्लीतही पेट्रोल 29 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी 69.26 रुपये मोजावे लागणार आहे. तर डिझेलच्या दरात 30 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 63.32 रुपयांवर आला आहे. 


(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - मुंबई)

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये घसरण होत आहे. इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झालं आहे. 


(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - दिल्ली)

Web Title: petrol price today down 29 paise diesel 32 paise at lowest level in 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.