Today's Fuel Price: पेट्रोल 34 पैशांनी तर डिझेल 39 पैशांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 10:18 AM2018-12-01T10:18:27+5:302018-12-01T10:21:23+5:30

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 34 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 78.08 रुपये मोजावे लागतील.

petrol price falls 34 paise mumbai diesel costs 39 paise less | Today's Fuel Price: पेट्रोल 34 पैशांनी तर डिझेल 39 पैशांनी स्वस्त

Today's Fuel Price: पेट्रोल 34 पैशांनी तर डिझेल 39 पैशांनी स्वस्त

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे.मुंबईकरांना प्रति लिटर पेट्रोलसाठी 78.08 रुपये तर प्रति लिटर डिझेलसाठी 70.49 रुपये मोजावे लागणार आहेत.राजधानी नवी दिल्लीतही पेट्रोल 34 पैशांनी तर डिझेल 37 पैशांनी स्वस्त झालं आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 34 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 78.08 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 39 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 70.49 रुपयांवर आला आहे. 

दिल्लीतही इंधनाचे दर घटले आहेत. दिल्लीतही पेट्रोल 34 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी 72.53 रुपये मोजावे लागणार आहे. तर डिझेलच्या दरात 37 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 67.35 रुपयांवर आला आहे.

 
(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - मुंबई)

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये घसरण होत आहे. इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झालं आहे. 6 ऑक्टोबरला पाच राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात असतानाच, तेल कंपन्यांनी 18 ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलची दरकपात सुरू केली आहे. यावरून सरकारी तेल कंपन्यांची निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून दरकपात केल्याचे दिसून येत आहे. निवडणुका संपताच डिसेंबरात इंधनाचे दर भडकण्याची भीती आहे.

(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - दिल्ली)

Web Title: petrol price falls 34 paise mumbai diesel costs 39 paise less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.