देशभक्ती पुस्तकातून येत नाही - जावेद अख्तर यांना बबिता फोगाटचे प्रत्युत्तर

By admin | Published: March 1, 2017 12:01 AM2017-03-01T00:01:05+5:302017-03-01T00:01:05+5:30

गुरमेहर कौर विवादात आपले मत मांडणाऱ्या वीरेंद्र सेहवाग आणि योगेश्वर दत्त यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीवर कटाक्ष

Patriot does not come from book - Javed Akhtar's reply to Babita Fogat | देशभक्ती पुस्तकातून येत नाही - जावेद अख्तर यांना बबिता फोगाटचे प्रत्युत्तर

देशभक्ती पुस्तकातून येत नाही - जावेद अख्तर यांना बबिता फोगाटचे प्रत्युत्तर

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि 28  -  गुरमेहर कौर विवादात आपले मत मांडणाऱ्या वीरेंद्र सेहवाग आणि योगेश्वर दत्त यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीवर कटाक्ष टाकणाऱ्या जावेद अख्तर यांच्यावर कुस्तीपटू बबिता फोगट हिने टीका केली आहे.  पुस्तके वाचल्याने देशभक्ती येत नाही असा टोला तिने लगावला आहे.
वीरेंद्र सेहवाग, योगेश्वर दत्त आणि गीता फोगाट यांनी गुरमेहर कौरच्या मताविरोधात टीप्पणी केल्याने जावेद अख्तर यांनी त्यांच्यावर टीका करताना त्यांच्या कमी शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. अडखळत धडपडत शिककेल्या लोकांची गोष्ट वेगळी आहे, पण सुशिक्षित लोकांना काय ढाले आहे, असा प्रश्न जावेद अख्तर यांनी या सर्वांवर टीका करताना केला होता. 
त्याला प्रत्युत्तर देताना बबिता म्हणाली, "जावेद अख्तरजी मी जेव्हा शाळेचे तोंडदेखील पाहिले नव्हते तेव्हापासून भारत माता की जय म्हणत आहे. देशभक्ती केवळ पुस्तकातून येत नाही. तर योगेश्वर दत्त यानेही अख्तर यांना टोला लगावलाय, "जावेद अख्तरजी तुम्ही कविता, गोष्टी रचल्या असतील तर आम्हीसुद्धा छोटे छोटे पराक्रम करून देशाचे नाव जगात नेले आहे."   
 

Web Title: Patriot does not come from book - Javed Akhtar's reply to Babita Fogat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.