पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 05:28 PM2017-10-03T17:28:58+5:302017-10-03T17:33:45+5:30

जम्मू-काश्मीरच्या भिंबेर गाली सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्काराचा एक जवान शहीद झाला आहे. नायक महेंद्र चेमजुंग असे या शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे.  

Pakistan again violates ceasefire, a young martyr | पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद

Next
ठळक मुद्देपाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघनभारतीय लष्काराचा एक जवान शहीदभारतीय लष्कराकडून चोख प्रत्त्युत्तर

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या भिंबेर गाली सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्काराचा एक जवान शहीद झाला आहे. नायक महेंद्र चेमजुंग असे या शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे.  
पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे सतत उल्लंघन होत आहे. काल पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करीत सीमावर्ती भागातील डझनभर गावांना लक्ष्य केले. यात तीन मुलांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मोहल्ला कस्बा येथील असरार अहमद आणि ढिगवारच्या करमा गावातील यास्मीन अख्तर अशी दोन मृतांची नावे आहेत. दरम्यान, आज जम्मू-काश्मीरच्या भिंबेर गाली सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात नायक महेंद्र चेमजुंग शहीद झाले. पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्त्युत्तर दिले जात आहे. 



दुसरीकडे, श्रीनगरमधील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. मंगळवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी श्रीनगर विमानतळाजवळील बीएसएफ कॅम्पमध्ये घुसले व त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. मात्र, भारतीय सुरक्षा दलाकडूनही दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. जवान आणि दहशतवादी यांच्यात काही काळ चकमक सुरु होती. या  दहशतवादी हल्ल्यात बीएसएफचा एक अधिकारी शहीद झाला. मात्र, भारतीय सुरक्षा दलाला तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. 



Web Title: Pakistan again violates ceasefire, a young martyr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.