केवळ झाडावर चढून तो कमवतो महिन्याला सव्वालाख रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 05:51 AM2018-04-01T05:51:48+5:302018-04-01T05:51:48+5:30

सर्वच नशिबाच्या हवाली सोडून चालत नाही. मेहनतच श्रेष्ठ... मेहनत वाया जात नाही. त्याचे फळ हमखास पदरात पडतंच. हेच खरं. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत तब्बल बारा तास राबणारे केरळमधील ई. पी. सॅलिमॉन यांची दिवसाची कमाई ४ हजार रुपये, म्हणजेच दरमहा जवळपास सव्वा लाख रुपये आहे.

 Only he can earn Rs. | केवळ झाडावर चढून तो कमवतो महिन्याला सव्वालाख रुपये!

केवळ झाडावर चढून तो कमवतो महिन्याला सव्वालाख रुपये!

googlenewsNext

कोट्टायम : सर्वच नशिबाच्या हवाली सोडून चालत नाही. मेहनतच श्रेष्ठ... मेहनत वाया जात नाही. त्याचे फळ हमखास पदरात पडतंच. हेच खरं. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत तब्बल बारा तास राबणारे केरळमधील ई. पी. सॅलिमॉन यांची दिवसाची कमाई ४ हजार रुपये, म्हणजेच दरमहा जवळपास सव्वा लाख रुपये आहे. उंचच-उंच ताडीच्या झाडावर सरसर चढण्याचे कौशल्य आणि सातत्यानं मेहनत, हेच सॅलिमॉन यांचं भांडवल आहे. ताडाची झाडं असलेल्या मालकाला दर लिटर ताडीमागे ३० रुपये मिळतात, तर झाडांवर चढून ती ताडी खाली आणणाऱ्या सालिमॉन यांना लिटरमागे १८ रुपये मिळतात. याशिवाय सॅलिमॉनला रोजच्या भत्त्यापोटी ३०२ रुपयेही मिळतात. ते केरळ ताडी कामगार निधी मंडळाचे सदस्य आहेत. या मंडळाकडून पीएफ, ग्रॅच्युएटीही दिली जाते. वार्षिक बोनसही दिला जातो.
उन्हाळ्यात ताडीला खूप मागणी असल्याने त्यांची कमाईही खूप होते. गेल्या ३२ वर्षांपासून ते हे काम करत आहेत. हे काम तसं मोठ्या जिकरीचंच त्यामुळे तरुण पिढी या कामासाठी पुढेच येत नाही. त्यामुळे गरज असतानाही
सॅलिमॉनना सुटी घेता येत नाही. कौटुंबीक कार्यक्रमालाही त्याला जाता येत नाही. ताडी दररोज
उतवून विक्रेत्यांकडे पोहोचवावी लागते. वर्षातील ३६५ दिवस त्याचा मेहनतीचा जप चालूच असतो.
त्यांच्या या मेहनतीचा केरळ सरकारने गौरवही केला होता. मागच्या वर्षात त्यांनी ४० हजार लिटर ताडी उतरविली. त्यांच्या या मेहनतीचा लाभ मदाप्पाड
गावालाही झाला होता. तेही याच गावचे.

मालकीचे घर, मुलींचे शिक्षण...
या मेहनतीच्या कमाईतून सॅलिमॉन यांनी स्वत:चं पक्कं घर उभारले. त्यांची थोरली मुलगी एम. कॉम करते, तर धाकटीही बी. कॉम. झाली. जीवन काय, चांगलं-वाईट काय? याचे धडे वडिलांकडूनच मिळाले. मुलींना शिकवून त्यांचे हात पिवळे करायचे आहेत, हीच त्यांची इच्छा आहे.

Web Title:  Only he can earn Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :keralकेरळ