वर्षभरात मोदी सरकारनं बदलली 25 शहरं आणि गावांची नावं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 09:45 AM2018-11-12T09:45:37+5:302018-11-12T09:46:28+5:30

सांगलीतल्या लांडगेवाडीचं नावही लवकरच बदलणार

In One Year modi Government Changes Name Of 25 Villages And Cities | वर्षभरात मोदी सरकारनं बदलली 25 शहरं आणि गावांची नावं

वर्षभरात मोदी सरकारनं बदलली 25 शहरं आणि गावांची नावं

Next

नवी दिल्ली: मोदी सरकारनं गेल्या वर्षभरात जवळपास 25 गावं आणि शहरांच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याशिवाय नामांतराचे अनेक प्रस्ताव अद्यापही सरकारकडे प्रलंबित आहेत. यामध्ये पहिला क्रमांक पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. काही दिवसांपूर्वीच अलाहाबादचं नाव बदलून ते प्रयागराज करण्यात आलं. तर फैजाबादचं नामांतर अयोध्या असं करण्यात आलं. 

पश्चिम बंगालचं नामांतर बांग्ला करण्यासह अनेक ठिकाणच्या नामांतराचे प्रस्ताव मोदी सरकारकडे प्रलंबित आहेत. एखाद्या शहराच्या किंवा गावाच्या नामांतरांची प्रक्रिया खूप मोठी असते. नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विविध विभागांकडे पाठवला जातो. गेल्या वर्षभरात असे 25 प्रस्ताव सरकारनं मंजूर केल्याची माहिती गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. 

कोणकोणत्या ठिकाणांची नावं बदलली?
अलाहाबादचं नामांतर प्रयागराज आणि फैजाबादचं नाव बदलून ते अयोध्या करण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारनं दिला होता. याशिवाय आंध्र प्रदेशतील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजामुंदरीचं नामांतर राजामहेंद्रवरम असं करण्यास केंद्रानं मंजुरी दिली आहे. याशिवाय ओदिशाच्या भद्रक जिल्ह्यातील आऊटर व्हीलरचं नाव बदलून ते ए. पी. जे. अब्दुल कलाम आयलँड करण्यासही सरकारनं हिरवा कंदिल दिला आहे. तर केरळच्या मलुप्परा जिल्ह्यातील एरिक्कोडला एरिकोड, हरयाणाच्या जींद जिल्ह्यातील पिंडारीला पांडू देण्याचा प्रस्तावदेखील सरकारनं मंजूर केला आहे. 

या ठिकाणांची नावंही लवकरच बदलणार
लांडगेवाडी (सांगली, महाराष्ट्र)-  नरसिंहगांव
गढी सांपला (रोहतक, हरयाणा)- सर छोटू राम नगर
खाटू कलां गांव (नागौर, राजस्थान)- बड़ी खाटू
महगवां छक्का (पन्ना, मध्य प्रदेश)- महगवां सरकार
महगवां तिलिया (मध्य प्रदेश)- महगवां घाट
शुक्रताल खादर (मुजफ्फरपूर, उ. प्रदेश)- सुखतीर्थ खादर 
शुक्रताल बांगर (उ. प्रदेश)- सुखतीर्थ बांगर 
 

Web Title: In One Year modi Government Changes Name Of 25 Villages And Cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.