आता आधारसाठी ऑफलाइन व्हेरिफिकेशन, डेटा सुरक्षेची चिंता होणार दूर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 09:34 AM2018-10-03T09:34:34+5:302018-10-03T09:37:44+5:30

खासगीपणा आणि डेटा सुरक्षेबाबत नागरिकांना असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आधार कार्डच्या व्हेरिफिकेशनसाठी ऑफलाइन पर्यायांवर भर देण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.

Now offline verification for Adhar | आता आधारसाठी ऑफलाइन व्हेरिफिकेशन, डेटा सुरक्षेची चिंता होणार दूर 

आता आधारसाठी ऑफलाइन व्हेरिफिकेशन, डेटा सुरक्षेची चिंता होणार दूर 

Next

नवी दिल्ली - खासगीपणा आणि डेटा सुरक्षेबाबत नागरिकांना असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेआधार कार्डच्या व्हेरिफिकेशनसाठी ऑफलाइन पर्यायांवर भर देण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. यामध्ये ऑथेंटिकेशनसाठी UIDAI सर्व्हरची गरज भासणार नाही. आधार व्हेरिफिकेशनसाठी सरकार क्यूआर कोड आणि पेपरलेस केवायसीची योजना घेऊन येत आहे. ज्यामध्ये बायोमॅट्रिक डिटेल तसेच आधारच्या सर्व्हरचा वापर करण्याची गरज भासणार नाही. 
 
याअंतर्गत केवायसी प्रक्रियेसाठी युझर्सना आपला आधार क्रमांकसुद्धा द्यावा लागणार नाही. त्यामुळे युझर्सच्या खासगी माहितीचा दुरुपयोग आणि त्यांच्या ट्रॅकिंगची शंका समाप्त होईल. आधार व्हेरिफिकेशनची ऑफलाइन  प्रक्रिया प्रायव्हेट कंपन्यांसाठी बायोमेट्रिक प्रणालीवर आधारलेल्या आधार ऑथेंटिकेशनसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पूर्णपणे पालन करतील.  

ऑफलाइन केवायसीला सरकारसह सर्व सर्व्हिस प्रोव्हायडर  वापरू शकतील. ऑफलाइन आधार केवायसीला ड्रायव्हिंग लायसन, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, पायपोर्ट आणि पॅनकार्डव्यतिरिक्त वापरता येऊ शकेल. आधार केवायसीची विश्वसनीयता याला पर्यायाला लोकप्रिय बनवेल, अशी सरकारला अपेक्षा आहे. 
क्यूआर कोड UIDAI च्या संकेतस्थळावरून डाऊनलोड आणि प्रिंट करून घेता येणार आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर या संकेतस्थळावरून क्यूआर कोड रीडरला डाऊनलोड करू शकतो किंवा आधार कार्ड नंबर प्रिंटआऊटवरील क्यूआर कोड वाचरणारा स्कॅनर वापरू शकतात. तसेच UIDAI ने पेपरलेस लोकल ई-केवायसीचा सुद्धा प्रस्ताव ठेवला आहे. याला मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये ठेवता येईल.  

दरम्यान, ई-केवायसी आणि क्यूआर कोडमुळे खासगीपणाचे रक्षण होईल. तसेच याव्यतिरिक्त युझर्सना वैयक्तिक माहितीमध्ये केवळ आपले नाव आणि पत्ता द्यावा लागेल. ई-केवायसीच्या माध्यमातून आधार कार्ड क्रमांक न देताच बँक खाते उघडणे आणि सिम कार्ड मिळवणे शक्य होणार आहे.  

Web Title: Now offline verification for Adhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.