24 तासांच्या आत नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 10:43 AM2017-07-27T10:43:11+5:302017-07-27T10:47:52+5:30

नितीश कुमार यांनी सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे

Nitish kumar takes oath as Bihar CM before 24 hours of resigning | 24 तासांच्या आत नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान

24 तासांच्या आत नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान

Next

पाटणा, दि. 27 - बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन बिहारमध्ये राजकीय भूकंप घडविणारे नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. विशेष म्हणजे राजीनामा देऊन चोवीस तासही उलटले नाहीत तोवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम नितीश कुमार यांनी केला आहे. नितीश कुमार यांनी सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सकाळी 10 वाजता राजभवानात त्यांचा शपथविधी पार पडला. नितीश कुमार यांच्यासोबत सुशील मोदी यांचाही शपथविधी पार पडला. सुशील मोदी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 


बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपा - जदयू समीकरण जुळलं असून 20 महिन्यांच्या आत बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. दरम्यान राजभवन परिसरात जमावबंदी लागू करण्यात आल्याने आरजेडीने आयोजित केलेला मोर्चा रद्द करण्यात आला.


नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारी नाट्याला झालेली सुरुवात पहाटे तीन वाजेपर्यंत सुरु होती. रात्री उशीरा नितीशकुमार आणि सुशील मोदी यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. त्यांच्यामध्ये दोन तास चर्चा झाली. यानंतर नितीश कुमार यांना पत्रकारांशी कोणताही संवाद न साधता थेट घरी जाणे पसंद केले. मात्र सुशील मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शपथविधी सकाळी पार पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. 'आम्ही राज्यपालांना भेटलो आहे. आमच्याकडील 132 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठींना दिले आहे. आम्ही विश्वास ठराव पास करु', असं सुशील मोदी बोलले होते. 




दरम्यान, 1:30 वाजता राजभनातून नितीशकुमार आणि सुशीलकुमार मोदी राज्यपालांना भेटून गेल्यानंतर पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांसह तेजस्वी यादव यांनी राजभवनावर आपला मोर्चा काढला होता. यावेळी राजभवनाच्या परिसरात नितीश कुमार विरोधात तेजस्वी यादवांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आरजेडीच्या सहा आमदारांना भेटण्याची परवानगी मिळाली होती. तेजस्वी यादव यांच्यासह सहा जणांनी पहाटे अडीच वाजता राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठींची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपले मुद्दे त्यांच्यापुढे ठेवले. सकाळी 11 वाजता आम्हाला विश्वास ठराव मंजुर करण्याचे सांगितले असताना नितीश कुमार यांना सकाळी दहा वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची परवानगी कशी दिली. बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष आमचा असताना नितीश कुमार यांना आपच्या आधी विश्वास ठराव करण्याची परवानगी कशी ? असे अनेक प्रश्न तेजस्वी यादव यांनी उपस्थित केले. 

Web Title: Nitish kumar takes oath as Bihar CM before 24 hours of resigning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.