भूदल, हवाई दलानंतर आता नौदलाची बारी; युद्धनौकांची पाकिस्तानवर नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 11:53 PM2019-02-26T23:53:21+5:302019-02-26T23:56:12+5:30

पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. अख्खा देश हळहळला. जैश-ए-मोहम्मदचा आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी देशभरातून होत होती.

Navy in action after Air Force; warships watch on Pakistan navy | भूदल, हवाई दलानंतर आता नौदलाची बारी; युद्धनौकांची पाकिस्तानवर नजर

भूदल, हवाई दलानंतर आता नौदलाची बारी; युद्धनौकांची पाकिस्तानवर नजर

Next

मुंबई : पुलवामा हल्ल्याचा बदला आज मध्यरात्री हवाईदलाने पूर्ण केला असून पाकमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या तळावर जोरदार हल्ले चढविले आहेत. यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला असून त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. या पार्श्वभुमीवर भारतामध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आला असून नौदलानेही कंबर कसली आहे. 


पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. अख्खा देश हळहळला. जैश-ए-मोहम्मदचा आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी देशभरातून होत होती. लष्कराच्या मनातही असंतोष खदखदत होताच. पण, घाईघाईत कुठलंही चुकीचं पाऊल न उचलता, अत्यंत थंड डोक्याने दिवस-रात्र एक करून तिन्ही दलांनी एकत्रितपणे आखणी केली आणि आज भारताला मोठं यश मिळालं. मिराज 2000 या विमानांमधून १००० किलोचे बॉम्ब जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर टाकण्यात आले आणि मसूद अझरचा भाऊ, मेव्हण्यासह ३०० दहशतवादी मातीत गाडले गेले. पाकिस्तानने वारंवार आश्वासन देऊनही जैशचा बंदोबस्त न केल्यानं आणि त्यांच्याकडून आणखी दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्यानंच हा हल्ला केल्याचं परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केलं.  


भारताच्या हवाई हल्ल्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची वेळ आणि ठिकाण ठरवून हल्ला करण्याची धमकी दिली आहे. शिवाय पाकिस्तानचे दहशतवाद्यांचे स्लीपर सेलही घातपात घडविण्याची शक्यता आहे. यामुळे सावधगिरी म्हणून सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 




भारतीय नौदलानेही पश्चिमेकडील समुद्रातील ट्रोपेक्स हा युद्धनौकांचा सराव थांबविला असून या भागातील युद्ध नौकांना पाकिस्तानी नौदलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. पाकिस्तानपासून गुजरातमधील बंदरे जवळ असून देशाची आर्थिक राजधानी मुंबईही टप्प्यात आहे. यामुळे भारताच्या युद्धनौका या भागात गस्त घालणार असून गरज पडल्यास कारवाईही करण्याच्या तयारीमध्ये ठेवण्यात आली आहेत. तसेच पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमकडूनही भारतीय हद्दीत हल्ला होण्याच्या शक्यतेने भूदलालाही अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Web Title: Navy in action after Air Force; warships watch on Pakistan navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.