नरेंद्र मोदी हे कलयुगातील कालिया नाग - लालूप्रसाद यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2015 01:37 PM2015-07-26T13:37:51+5:302015-07-26T14:29:37+5:30

नरेंद्र मोदी यांच्या रुपाने कालिया नागाने कलयुगात पुनर्जन्म घेतला असून आम्ही कृष्णाप्रमाणेच या नागाला बिहारमधून पळवून लावू अशा तिखट शब्दात लालूप्रसाद यादव यांनी मोदींवर टीका केली आहे.

Narendra Modi is the Kalia Nag of Kaluag - Lalu Prasad Yadav | नरेंद्र मोदी हे कलयुगातील कालिया नाग - लालूप्रसाद यादव

नरेंद्र मोदी हे कलयुगातील कालिया नाग - लालूप्रसाद यादव

Next
>ऑनलाइन लोकमत 
पाटणा, दि. २६ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने कालिया नागाने कलयुगात पुर्नजन्म घेतला असून आम्ही कृष्णाप्रमाणेच या नागाला बिहारमधून पळवून लावू अशा तिखट शब्दात लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनण्यासाठी पात्र नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. 
जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करावी यासाठी लालूप्रसाद यादव हे पाटणा येथील महात्मा गांधी स्मारकाजवळ उपोषणाला बसले आहेत. या दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लालूप्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदींची तुलना कालिया नागाशी केली आहे. मोदींच्या रुपातील गालिया नाग आधी गुजरातला व आता संपूर्ण देशाला दंश करायला निघाला आहे, पण आम्ही कृष्णाप्रमाणेच या नागाला बिहारमधून पळवून लावू असे त्यांनी म्हटले आहे. आम्ही कोणत्याही जातीविरोधात लढा देत नसून आम्ही गरीबांसाठी ही लढाई करतोय असे त्यांनी नमूद केले. 
 

Web Title: Narendra Modi is the Kalia Nag of Kaluag - Lalu Prasad Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.