साडेचार वर्षांत मोदींनी गमावला मंत्रिमंडळातील तिसरा सहकारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 11:44 AM2018-11-12T11:44:19+5:302018-11-12T11:45:46+5:30

अनंत कुमार यांच्या रूपात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या साडे चार वर्षांतील कार्यकाळामध्ये मंत्रिमंडळातील तिसऱ्या सहकाऱ्याला गमवावे लागले आहे.

Narendra lost his third Co Minister in the last four & half years | साडेचार वर्षांत मोदींनी गमावला मंत्रिमंडळातील तिसरा सहकारी 

साडेचार वर्षांत मोदींनी गमावला मंत्रिमंडळातील तिसरा सहकारी 

googlenewsNext

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे कर्नाटकमधील दिग्गज नेते अनंत कुमार यांचे आज निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि भाजपाची मोठी हानी झाली असून, अनंत कुमार यांच्या रूपात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या साडे चार वर्षांतील कार्यकाळामध्ये मंत्रिमंडळातील तिसऱ्या सहकाऱ्याला गमवावे लागले आहे. अनंतकुमार यांच्या आधी मोदींच्या मंत्रिमंडळातील अन्य दोन सदस्यांचेही अकाली निधन झाले होते. 

2014 साली भाजपाला केंद्रात सत्ता मिळून मंत्रिमंडळाचा शपथविधी उरकल्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्रीत ज्येष्ठ नेते आणि मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री गोपिनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. मात्र अकाली निधनामुळे सर्वात कमी काळ मंत्रिपदी राहणाऱ्या मंत्र्यांमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली. 



 त्यानंतर गतवर्षी मे महिन्यात केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांचेय निधन झाले होते. पर्यावरणवादी म्हणून अनिल दवे यांची ओळख होती. त्यांनी आपले संपूर्ण जीवन नर्मदा नदी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी खर्च केले होते.  



दरम्यान, आज निधन झालेले केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी कर्नाटकमध्ये भाजपाची पाळेमुळे रुजवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातही अनंत कुमार यांचा समावेश होता. त्यावेळी मंत्रिमंडळामधील ते सर्वात तरुण मंत्री ठरले होते. 

Web Title: Narendra lost his third Co Minister in the last four & half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.