केंद्र सरकार उभारणार नरसिंह राव यांचे स्मारक

By admin | Published: March 31, 2015 09:40 AM2015-03-31T09:40:03+5:302015-03-31T13:05:58+5:30

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सन्मानार्थ केंद्र सरकार त्यांचे स्मारक उभारणार असल्याचे वृत्त आहे.

Narasimha Rao's memorial to be set up by the Central Government | केंद्र सरकार उभारणार नरसिंह राव यांचे स्मारक

केंद्र सरकार उभारणार नरसिंह राव यांचे स्मारक

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - देशाचे माजी पंतप्रधान आणि आर्थिक सुधारणांचे जनक पी.व्ही. नरसिंह राव यांचा उचित सन्मान करण्यासाठी मोदी सरकारने पाऊले उचलली असून दिल्लीत राव यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.  एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, गेल्या आठवड्यात या स्मारकासंदर्भातील प्रस्ताव केंद्रिय मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात आला होता. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाच्या सांगण्यावरूनच हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे समजते. 'एकता स्थळ' येथे हे स्मारक उभारण्यात येणार आहे.
काँग्रेसच्या काळात पंतप्रधान असलेले नरसिंह राव हे भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणांचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांचा गौरव करण्याचा भारतीय जनता पक्षाचा मानस असून त्या पार्श्वभूमीवरच हे स्मारक बांधण्यात येणार आहे. 
दरम्यान मृत्यूपूर्वीच काँग्रेस नरसिंह राव यांना विसरले असा आरोप भाजपातर्फे करण्यात येत आहे. 

Web Title: Narasimha Rao's memorial to be set up by the Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.