नाना पटोले अधिकृतपणे काँग्रेसमध्ये, राहुल गांधींची घेतली भेट, भाजपावर करीत होते टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 06:19 AM2018-01-12T06:19:58+5:302018-01-12T06:20:11+5:30

भाजपाला सातत्याने घरचा अहेर देऊन नाकीनऊ आणत रामराम ठोकणारे नाना पटोले यांनी गुरुवारी राहुल गांधी यांची भेट घेऊन कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. राहुल गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. नाना पटोलेंमुळे पक्षाला विदर्भात नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा कॉँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

Nana Patole was officially in the Congress, Rahul Gandhi's meeting was a gift, criticized BJP on BJP | नाना पटोले अधिकृतपणे काँग्रेसमध्ये, राहुल गांधींची घेतली भेट, भाजपावर करीत होते टीका

नाना पटोले अधिकृतपणे काँग्रेसमध्ये, राहुल गांधींची घेतली भेट, भाजपावर करीत होते टीका

Next

नवी दिल्ली : भाजपाला सातत्याने घरचा अहेर देऊन नाकीनऊ आणत रामराम ठोकणारे नाना पटोले यांनी गुरुवारी राहुल गांधी यांची भेट घेऊन कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. राहुल गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. नाना पटोलेंमुळे पक्षाला विदर्भात नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा कॉँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.
पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सातत्याने लक्ष्य केले. भाजपा सरकार शेतकºयांच्या हिताचे नसल्याची ते सतत टीका करीत. आपणास अपमानास्पद वागणूक देणारे मोदी माझ्या मतदारसंघातील प्रत्येकाचा अपमान करत असल्याचे सांगून, त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकला।
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांची राहुल गांधी यांच्याशी भेट घालून दिली, तेव्हाच त्यांचा कॉँग्रेसप्रवेश निश्चित झाला. कॉँग्रेसमध्ये अद्याप प्रवेश झाला नाही, मला पुन्हा पश्चात्ताप होणार नाही अशी बातमी लवकरच देणार असल्याचे पटोले यांनी गेल्याच आठवड्यात ‘लोकमत’ला सांगितले होते.

पुन्हा लढणार
विदर्भातील ओबीसींचे नेते म्हणून
नाना पटोलेंची ओळख आहे. ते २००८ पर्यंत काँग्रेसमध्ये होते. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबत मतभेद झाल्याने पटोले यांनी भाजपाला जवळ केले होते.
ते २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपातर्फे
लोकसभेवर निवडून आले.
पटोले यांच्या राजीनाम्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मुदतपूर्व निवडणूक होईल. त्या वेळी पटोले कॉँग्रेसचे उमेदवार म्हणून भाजपाच्या विरोधात दमदारपणे प्रचार करण्याची शक्यता आहे.

Web Title: Nana Patole was officially in the Congress, Rahul Gandhi's meeting was a gift, criticized BJP on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.