माझ्यावरील आरोप बिनबुडाचे, कायदेशीर कारवाई करणार- एम. जे. अकबर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 04:29 PM2018-10-14T16:29:49+5:302018-10-14T16:33:10+5:30

भाजपा नेते आणि माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी लैंगिक शोषणाच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

My allegations against me will be legal action - M. J. Akbar | माझ्यावरील आरोप बिनबुडाचे, कायदेशीर कारवाई करणार- एम. जे. अकबर 

माझ्यावरील आरोप बिनबुडाचे, कायदेशीर कारवाई करणार- एम. जे. अकबर 

Next

नवी दिल्ली- भाजपा नेते आणि माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी लैंगिक शोषणाच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. एम. जे. अकबर म्हणाले, कोणतीही साक्ष नसताना आरोप करणं हे आता व्हायरल तापासारखं झालं आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. माझ्यावर आरोप करणा-या व्यक्तींविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार आहे.

काही वेळापूर्वीच त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. #MeToo मोहिमेदरम्यान आरोप झालेले केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर आज भारतात परतले आहे. विमानतळावरच पत्रकारांनी त्यांना गाठले. त्यावेळी आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत नंतर बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.







मात्र, राजीनामा देणार का, असे विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण अकबर यांनी राजीनामा दिल्याचे समजते. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे ई-मेलद्वारे आपला राजीनामा दिला असून, पंतप्रधानांच्या सचिवांनी त्यांच्या राजीनाम्याची नोंद केल्याचीही माहिती आहे. 

काय आहे प्रकरण ?
एम. जे. अकबर यांच्याविरोधात पहिली तक्रार प्रिया रमणी यांनी केली होती. त्यानंतर गझला वहाब, साबा नकवी, शुतापा पॉल, शुमा राहा, सुपर्णा शर्मा व प्रेरणा सिंग बिंद्रा यांनीही अकबर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या. या सर्व महिला पत्रकारांनी अकबर यांच्या हाताखाली कधी ना कधी काम केले आहे. पुरुष आपल्या पदाचा अनेकदा गैरवापर करताना आढळतात. चित्रपटसृष्टीप्रमाणे माध्यमे, राजकारण आणि कंपन्यांतील वरिष्ठ अधिकारी असे करत असतात. आता महिला उघडपणे बोलू लागल्या असून, त्यांचे म्हणणे गांभीर्याने घ्यायलाच हवे, असंही केंद्रीय मंत्री मनेका गांधी म्हणाल्या आहेत. 

Web Title: My allegations against me will be legal action - M. J. Akbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.