अखेर 'छक्क्या'च्या धक्क्यातून सावरलं हे गाव; सरकारचा गावकऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 03:58 PM2018-06-06T15:58:39+5:302018-06-06T15:58:39+5:30

या गावातील लोकांनी गावाचं छक्का हे नावच बदलून टाकलं आहे. आता या गावाचं नाव महगवान सरकार असं ठेवण्यात आलं आहे.

This MP village is no more 'Chhakka' | अखेर 'छक्क्या'च्या धक्क्यातून सावरलं हे गाव; सरकारचा गावकऱ्यांना दिलासा

अखेर 'छक्क्या'च्या धक्क्यातून सावरलं हे गाव; सरकारचा गावकऱ्यांना दिलासा

googlenewsNext

भोपाळ- गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या गावाच्या मागे छक्का हे नाव लागल्यानं लाज बाळगणा-या गावक-यांची आता त्यातून सुटका झाली आहे. पन्ना जिल्ह्यातल्या एका मागास गावातल्या गावक-यांना आता गावाचं नाव सांगण्यास लाज वाटणार नाही. या गावातील लोकांनी गावाचं छक्का हे नावच बदलून टाकलं आहे. आता या गावाचं नाव महगवान सरकार असं ठेवण्यात आलं आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पन्ना जिल्ह्यातल्या या गावाला 1924 रोजी महगवान छक्का असं नाव पडलं. गावातले माजी तहसीलदार फैज मोहम्मद यांच्यामते, गावाचं नाव असं का ठेवण्यात आलं हे अद्याप कोणालाही माहीत नाही. 2013मध्ये गावच्या पंचायतीकडून नाव बदलण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. गावातले रहिवासी अनिल कुमार पाठक म्हणाले, गावातल्या लोकांना स्वतःच्या गावाचं नाव सांगताना लाज वाटत होती. त्यानंतर महगवान हे नाव काढून फक्त छक्का ठेवण्यात आलं होतं.

दोन वर्षांपूर्वी राज्याकडून केंद्राला नावाचं गाव बदलण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानंतर 7 सप्टेंबर 2017ला केंद्रानं या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी होत आता गावाचं नाव बदलून महगवान सरकार ठेवण्यात आलं आहे. 2011च्या लोकसंख्येनुसार महगवान सरकार गावात 280 कुटुंबे राहतात. गावाची एकूण लोकसंख्या 1139 एवढी आहे. 

Web Title: This MP village is no more 'Chhakka'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.