मोदींवरील खिल्ली अंगलट; AIB विरोधात गुन्हा दाखल

By admin | Published: July 14, 2017 10:20 AM2017-07-14T10:20:38+5:302017-07-14T15:33:43+5:30

स्नॅपचॅटचं डॉगी फिल्टर वापरून मोदींच्या फोटोची खिल्ली उडवणं एआयबीला चांगलंच अंगलट आलं आहे. एआयबी विरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे.

Modi screams; Filed a complaint against AIB | मोदींवरील खिल्ली अंगलट; AIB विरोधात गुन्हा दाखल

मोदींवरील खिल्ली अंगलट; AIB विरोधात गुन्हा दाखल

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 14- स्नॅपचॅटचं डॉगी फिल्टर वापरून मोदींच्या फोटोची खिल्ली उडवणं एआयबीला चांगलंच अंगलट आलं आहे. एआयबी’विरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एआयबीच्या कृत्याची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला होता. या संपूर्ण तपासानंतर एआयबी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पण आता मुंबई पोलिसांच्या या कारवाईवर नेटीइन्सने नाराजी व्यक्त केली आहे. मुलींच्या तक्रारी दाखल करुन घ्यायला टाळाटाळ करणारे पोलीस मोदींविरोधातील प्रकरणावर कशी तत्परता दाखवतात, अशा शब्दात ट्विटर युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. 

मोदींच्या खऱ्याखुऱ्या फोटोवर स्नॅपचॅटवरच डॉगी फिल्टर वापरून मोदींची खिल्ली उडवल्याचं उघडकीस आलं आहे. एआयबीने मोदींचा हा फोटो शेअर केला होता. या फोटोवरून तीव्र शब्दात निषेध नोंदविल्यानंतर एआयबीने हा फोटो टि्वटरवरून हटवला आहे. याआधी सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्याबद्दलचा व्हिडीओ तयार करून एआयबीने वाद ओढवून घेतला होता. त्या व्हिडीओनंतर एआयबी सगळीकडेच चर्चेचा विषय झाला होता.

एआयबीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवर स्नॅपचॅटचं डॉगी फिल्टर वापरून फोटो तयार केला आणि तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोवरून नेटीझन्सने तीव्र शब्दात एआयबीवर टीका केली. सोशल मीडियावरील या टीकेनंतर एआयबीने हा फोटो टि्वटरवरून हटवला आहे. काही युजर्सने थेट मुंबई पोलिसांना टॅग करून एआयबीच्या कृतीवर निषेध नोंदविला. त्याची दखल मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण विभागाने घेतली असून या प्रकरणी तपास सुरू केला आहे. हे फोटो लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आता हे प्रकरण सायबर सेलकडे देण्यात येत असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. ट्विटरवरचा हा फोटो पाहून रीतेश महेश्वरी या ट्विटर युजरने मुंबई पोलिसांना टॅग करत कारवाईची मागणी केली होती.  "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोची अशा प्रकारे मस्करी करणाऱ्या एआयबी आणि तन्मय भट्ट या दोघांवरही कडक कारवाई व्हायला हवी, असं रीतेश महेश्वरी याने म्हंटलं आहे. 
आणखी वाचा
 

मोदी सरकारच्या बाजूने जनतेचा विश्वास दर्शक ठराव

विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार हजेरी

उत्सव काळात नियम पाळा वा परिणाम भोगा

दरम्यान, या संदर्भातील तपास सुरू झाला असून सविस्तर माहिती जमा केली जाते आहे, असं पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितलं आहे. 

 
एआयबीचा कॉमेडियन तन्मय भट्ट याने मात्र या संपूर्ण कृतीचं समर्थन करत ट्विट केलं आहे. आम्ही जोक्स बनवू आणि गरज पडल्यास ते डिलिट करू. पुन्हा जोक्स निर्माण करू आणि वेळ पडली तर माफी मागू. तुम्ही काय विचार करता याच्याशी आम्हाल देणं-घेणं नाही", असं टि्वट तन्मयने केलं आहे. 
 
 याआधी मुंबईत झालेल्या एआयबीच्या कार्यक्रमांमध्ये आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या तक्रारी मुंबई पोलिसांकडे आल्या होत्या.
 

Web Title: Modi screams; Filed a complaint against AIB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.