स्मार्टफोनला विरोध नाही, मात्र त्याचा वापर स्मार्टली व्हावा- लष्करप्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 11:34 AM2018-09-04T11:34:15+5:302018-09-04T11:38:48+5:30

सोशल मीडिया, स्मार्टफोनच्या वापराबद्दल लष्करप्रमुखांचं महत्त्वपूर्ण विधान

in modern day info warfare social media is important says army chief bipin rawat | स्मार्टफोनला विरोध नाही, मात्र त्याचा वापर स्मार्टली व्हावा- लष्करप्रमुख

स्मार्टफोनला विरोध नाही, मात्र त्याचा वापर स्मार्टली व्हावा- लष्करप्रमुख

Next

नवी दिल्ली : सोशल मीडियापासून दूर राहा असा सल्ला जवानांना द्या, अशा सूचना आम्हाला अनेकांकडून देण्यात येतात. मात्र जवानांना स्मार्टफोनपासून दूर ठेवता येऊ शकतं का?, असा प्रश्न लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी उपस्थित केला आहे. नवी दिल्लीत 'सोशल मीडिया आणि सुरक्षा दल' या विषयावर बोलताना लष्करप्रमुखांनी त्यांची मतं व्यक्त केली. काही महिन्यांपूर्वी अनेक जवानांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडल्या होत्या. यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून जवान आणि अधिकाऱ्यांना 'हनीट्रॅप' केलं जात असल्याचंही समोर आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर रावत यांनी स्मार्टफोन आणि सोशल मीडियाबद्दल व्यक्त केलेली मतं महत्त्वपूर्ण मानली जात आहेत. 




जर तुम्ही स्मार्टफोनचा वापर करण्यापासून जवानांना रोखू शकत नसाल, तर या गोष्टीला परवानगी देणं जास्त चांगलं होईल, असं बिपिन रावत यांनी म्हटलं. स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा वापर करत असताना शिस्त पाळायला हवी, असं सांगायलादेखील ते विसरले नाहीत. 'सध्याच्या घडीला रणनितीच्या दृष्टीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही जवानांशी याबद्दल संवाद साधत आहोत,' असं लष्करप्रमुख म्हणाले. 




जर आपल्याला फायदा होत असेल, तर आर्टिफिशयल इंटेलिजन्सचा वापर करुन सोशल मीडियावर सक्रीय राहायला हवं. कारण आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जे हवं आहे, ते आपल्याला सोशल मीडियावर मिळेल, असं बिपिन रावत यांनी म्हटलं. 'सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. शत्रूकडून मानसिक लढाईचा भाग म्हणून सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. मात्र आम्ही आमच्या फायद्यासाठी सोशल मीडियाचा वापर करु,' असं ते म्हणाले. 



 

Web Title: in modern day info warfare social media is important says army chief bipin rawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.