नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 'या'DGCA अधिकाऱ्याला केले निलंबित; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 10:26 PM2023-11-22T22:26:07+5:302023-11-22T22:30:32+5:30

सरकारने बुधवारी भ्रष्टाचार प्रकरणी डीजीसीएमधील एरोस्पोर्ट्स संचालनालयाचे कॅप्टन अनिल गिल यांना निलंबित केले.

Ministry of Civil Aviation suspends 'this' DGCA officer; What exactly is the case? | नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 'या'DGCA अधिकाऱ्याला केले निलंबित; नेमकं प्रकरण काय?

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 'या'DGCA अधिकाऱ्याला केले निलंबित; नेमकं प्रकरण काय?

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातील एअरोस्पोर्ट्सचे संचालक कॅप्टन अनिल गिल यांच्यावर बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी सरकारने मोठी कारवाई केली. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अनिल गिल यांना भ्रष्टाचार प्रकरणी निलंबित केले आहे.

डीपफेकबाबत पीएम मोदी चिंतेत; G-20 व्हर्च्युल समिटमध्ये जागतिक नेत्यांना केलं आवाहन

या प्रकरणाबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, आमच्या सरकारचे भ्रष्टाचाराविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत शून्य सहनशीलतेचे धोरण आहे. असे झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.

सरकारने ही कारवाई अशा वेळी केली जेव्हा अलीकडेच डीजीसीएने लाचखोरीचे प्रकरण सीबीआय आणि ईडीकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. डीजीसीएला एक ईमेल आला होता. यामध्ये गिल यांच्यावर आरोप करण्यात आले होते.

Web Title: Ministry of Civil Aviation suspends 'this' DGCA officer; What exactly is the case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.