मर्सिडीज, फरारीपेक्षाही रेड्यांची किंमत जास्त! खाण्यापिण्याचा रोजचा खर्च साडेतीन हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 05:57 AM2018-04-01T05:57:47+5:302018-04-01T05:57:47+5:30

हरयाणा या राज्याचं वर्णन ‘देस में देश हरयाणा, जित दूध-दही का खाणा’, असं केलं जातं. दूध व दही यांतूनच हरयाणातील पैलवानांचं नाव जगभर झालं आहे. अशा या राज्यात पैलवानांप्रमाणे मुर्रा जातीचे रेडेही अनेक स्पर्धा जिंकून देत आहेत.

Mercedes, the price of the fare more than the furrows! The daily consumption of food is three and a half thousand | मर्सिडीज, फरारीपेक्षाही रेड्यांची किंमत जास्त! खाण्यापिण्याचा रोजचा खर्च साडेतीन हजार

मर्सिडीज, फरारीपेक्षाही रेड्यांची किंमत जास्त! खाण्यापिण्याचा रोजचा खर्च साडेतीन हजार

Next

- बलवंत तक्षक

चंदीगड : हरयाणा या राज्याचं वर्णन ‘देस में देश हरयाणा, जित दूध-दही का खाणा’, असं केलं जातं. दूध व दही यांतूनच हरयाणातील पैलवानांचं नाव जगभर झालं आहे. अशा या राज्यात पैलवानांप्रमाणे मुर्रा जातीचे रेडेही अनेक स्पर्धा जिंकून देत आहेत. या मुर्राह जातीच्या रेड्यांची किंमत काही कोटींमध्ये असते. त्यांच्या किंमतीहून आॅडी, मर्सीडिज व फरारी या महागड्याही स्वस्त वाटू लागतात. मुर्रा म्हशीची किंमतही एक कोटी रुपयांच्या आसपास असते.
सोनीपत जिल्ह्याच्या गोहानामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पशु मेळा व बाजारात मुर्राह जातीच्या रेडे व म्हशींची किंमत ऐकून लोकही अचंबित झाले. कैथल जिल्ह्यातील बुढ्ढा गावातील नरेश बेनिवाल यांनी या जनावर मेळ्यात सुल्तान नावाचा रेडा आणला होता. ज्याची किंमत होती १२ कोटी रुपये. सुल्तानचे वजन आणे १७0 क्विंटल. तो देशातील सर्वत उंच रेडा म्हणून ओळखला जातो. नऊ वर्षांचा सुल्तान नॅशनल चॅम्पियन आहे
भिवानी जिल्ह्यातील कुंगड गावातील पवन यांच्या मालकीच्या रेड्याची किंमत आहे ११ कोटी रुपये. त्याचं नाव आहे अर्जुन. तो आठ वर्षांचा आहे आणि त्याचा खाण्यापिण्याचा रोजचा खर्च आहे साडेतीन हजार रुपये.

एक क्विंटल चारा, २0 लीटर दूध
गोहोनामधील दलसिंह आपल्या चार वर्षांच्या ‘कमांडो’ ला घेऊ न मेळ्यात आले होते. त्याचं वजन आहे १६00 किलो आणि त्याला रोज एक क्विंटल चारा लागतो. शिवाय तो २0 लीटर दूध पितो.

- अनेक पुरस्कार जिंकले आहेत, पण दलसिंह आपल्या ‘कमांडो’ ला विकू इच्छित नाहीत. या मेळ्यामध्ये सुल्तान, अर्जुन व कमांडो यांच्यासह सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी झाली होती.

- या रेड्यांच्या स्पर्मला अधिक मागणी आहे. त्यांचे स्पर्म लाखो रूपयांना विकले जातात. त्यामुळे मालकही त्यांच्यावर हजारो रुपये खर्च करीत आहेत.

Web Title: Mercedes, the price of the fare more than the furrows! The daily consumption of food is three and a half thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.