नरोडा पाटिया दंगलीच्यावेळी माया कोडनानी गुजरात विधानसभेत होत्या; अमित शहांची कोर्टात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 01:04 PM2017-09-18T13:04:25+5:302017-09-18T16:50:33+5:30

गुजरातमधील नरोडा पाटिया दंगल प्रकरणात भाजपा अध्यक्ष अमित शहा त्यांची साक्ष नोंदवण्यासाठी विशेष सत्र न्यायालयात पोहचले होते.

Maya Kodnani was in the Gujarat Legislative Assembly during the riots in Naroda Patia; Amit Shah's court information | नरोडा पाटिया दंगलीच्यावेळी माया कोडनानी गुजरात विधानसभेत होत्या; अमित शहांची कोर्टात माहिती

नरोडा पाटिया दंगलीच्यावेळी माया कोडनानी गुजरात विधानसभेत होत्या; अमित शहांची कोर्टात माहिती

Next
ठळक मुद्देगुजरातमधील नरोडा पाटिया दंगल प्रकरणात भाजपा अध्यक्ष अमित शहा त्यांची साक्ष नोंदवण्यासाठी विशेष सत्र न्यायालयात पोहचले होते. दंगलीची घटना घडली त्यावेळी माजी मंत्री माया कोडनानी या गुजरात विधानसभेत उपस्थित होत्या, अशी साक्ष त्यांनी कोर्टात दिली आहे. २८ फेब्रुवारी २००२ रोजी कोडनानी यांची विधानसभेत भेट झाली होती, असंही अमिकत शहा यांनी कोर्टात सांगितलं आहे.

अहमदाबाद, दि. 18- गुजरातमधील नरोडा पाटिया दंगल प्रकरणात भाजपा अध्यक्ष अमित शहा त्यांची साक्ष नोंदवण्यासाठी विशेष सत्र न्यायालयात पोहचले होते. दंगलीची घटना घडली त्यावेळी माजी मंत्री माया कोडनानी या गुजरात विधानसभेत उपस्थित होत्या, अशी साक्ष त्यांनी कोर्टात दिली आहे. २८ फेब्रुवारी २००२ रोजी कोडनानी यांची विधानसभेत भेट झाली होती, असंही अमित शहा यांनी कोर्टात सांगितलं आहे.


नरोडा पाटियामध्ये झालेल्या दंगलीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी माया कोडनानी गुजरात सरकारमध्ये महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री होत्या. माया कोडनानी या दंगलीच्या सूत्रधार होत्या, असा ठपका कोर्टाने ठेवला आहे. याआधी झालेल्या या खटल्याच्या सुनावणीत कोडनानी यांनी साक्षीदार म्हणून अमित शहा यांना हजर करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला होता.


भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आपल्या बाजूने साक्ष देणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. अमित शहा त्यांच्या कामात जास्त व्यस्त असतात. मला अजूनपर्यंत त्यांच्या घरचा पत्ता मिळालेला नाही. त्यामुळे साक्षीदार म्हणून कोर्टात हजर राहण्यासाठीचं समन्स त्यांच्यापर्यंत पोहोचवता आलेलं नाही, असं कोडनानी त्यांनी सांगितलं होतं. कोडनानी यांची विनंती मान्य करत कोर्टाने शहांना साक्षीदार म्हणून कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. त्यानंतर सोमवारी अमिता शहा कोर्टात हजर झाले. आज अमित शहा यांनी कोडनानी यांच्या बाजूने साक्ष दिली आहे.

दंगलीची घटना घडली त्यावेळी गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी नरोडा गावात नव्हत्या. त्या दिवशी त्यांची आणि माझी गुजरात विधानसभेत भेट झाली होती, अशी साक्ष अमित शहा यांनी दिली आहे. अमित शहा यांनी आज कोर्टात दिलेली साक्ष महत्त्वाची मानली जाते आहे.

गुजरातमध्ये २00२ साली झालेल्या हिंदू-मुस्लीम दंगलीच्या संदर्भात भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी १८ सप्टेंबर रोजी कोर्टात साक्ष देण्यासाठी यावे यासाठी समन्स निघाले. नरोदा पाटिया येथील दंगलीच्या प्रकरणी गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी यांना याआधी न्यायालयाने दोषी ठरवलं. आता नरोदा गावात झालेल्या दंगलीतील सहभागाबद्दल विशेष कोर्टात खटला सुरू असून, बचाव साक्षीदार म्हणून अमित शहा यांचं नाव आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, माया कोडनानी मंत्री होत्या.

नरोदा येथे जेव्हा दंगल झाली, तेव्हा आपण अमित शहा यांच्यासमवेत रुग्णालयात गेलो होतो, त्यामुळे आपला दंगलीत सहभाग नाही, असा दावा माया कोडनानी यांनी कोर्टात केला होता.
 

Web Title: Maya Kodnani was in the Gujarat Legislative Assembly during the riots in Naroda Patia; Amit Shah's court information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.