मक्कल नीथी मय्यम... कमल हासन यांच्या नव्या पक्षाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 20:42 IST2018-02-21T20:22:27+5:302018-02-21T20:42:28+5:30

तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एका सिनेकलाकराचे आगमन झाले आहे. अभिनेता रजनीकांत यांच्यानंतर कमल हासन यांनी राजकरणात एन्ट्री केली असून त्यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या नव्या राजकीय पक्षाचे नाव 'मक्कल नीथी मय्यम' असे जाहीर केले असून पक्षाचे चिन्ह आणि झेंड्याचेही अनावरण करण्यात आले.  

Makkal Neethi Myam ... The announcement of Kamal Haasan's new party | मक्कल नीथी मय्यम... कमल हासन यांच्या नव्या पक्षाची घोषणा

मक्कल नीथी मय्यम... कमल हासन यांच्या नव्या पक्षाची घोषणा

मदुराई : तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एका सिनेकलाकराचे आगमन झाले आहे. अभिनेते रजनीकांत यांच्यानंतर कमल हासन यांनी राजकरणात एन्ट्री केली असून त्यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या नव्या राजकीय पक्षाचे नाव 'मक्कल नीथी मय्यम' असे जाहीर केले असून पक्षाचे चिन्ह आणि झेंड्याचेही अनावरण करण्यात आले.  
मदुराईमध्ये कमल हासन यांनी बुधवारी पक्ष स्थापनेसाठी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी नवीन पक्षाची घोषणा केली. या सभेदरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह काही राजकीय नेते आणि कमल हासन यांच्या चाहत्यांनी हजेरी लावली. पक्षाचे नाव घोषित करताना कमल हासन म्हणाले की, मक्कल नीथी मय्यम' पार्टी तुमची आहे. ही पार्टी लोकांसाठी आहे. मी फक्त तुमचा टूल आहे, तुमचा नेता नाही. मी तुमच्याकडून राजकीय सल्ल्याची मागणी करत आहे. 




दरम्यान, राजकारणात प्रवेश करण्याआधी कमल हासन आज सकाळी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या रामेश्वरमस्थित घरी गेले आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसंच मच्छिमारांनाही संबोधित केले. 
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी ज्या शाळेतून शिक्षण घेतले त्या शाळेमध्येही कमल हासन जाणार होते. पण नंतर त्यांचा हा कार्यक्रम रद्द झाला. यावेळी माध्यमांशी बोलताना कमल हासन म्हणाले, महानता साधारण घरातून येते हे घर त्यापैकी एक आहे. यामुळे मी प्रभावित झालो आहे. अब्दुल कलाम यांच्या घरी भेट दिल्यानंतर कमल हासन यांनी रामेस्वरममध्ये मच्छिमारांशी संवाद साधला होता. दुसरीकडे, कमल हासन यांच्या पक्षाच्या घोषणेआधीच राज्यात राजकीय वातावरणात तापल्याचे दिसून आले. डीएमकेचे वरीष्ठ नेते एमके स्टॅलिन यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिले. राजकारणात कागदाच्या फुलांमधून कधीही सुगंध येत नाही, असे त्यांनी पत्रात लिहिले. 

Web Title: Makkal Neethi Myam ... The announcement of Kamal Haasan's new party