Mahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधींची पहिल्या महायुद्धातील भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 09:53 AM2019-01-30T09:53:17+5:302019-01-30T09:55:07+5:30

महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. सत्य आणि अहिंसा यांचे प्रेरणास्त्रोत अशी महात्मा गांधीजींची ओळख आहे. त्यांची पहिल्या महायुद्धात काय भूमिका होती याबाबत आपण जाणून घेऊया.

Mahatma Gandhi Death Anniversary: The Role of Mahatma Gandhi's First World War | Mahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधींची पहिल्या महायुद्धातील भूमिका

Mahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधींची पहिल्या महायुद्धातील भूमिका

Next

मुंबई : महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. सत्य आणि अहिंसा यांचे प्रेरणास्त्रोत अशी महात्मा गांधीजींची ओळख आहे. त्यांची पहिल्या महायुद्धात काय भूमिका होती याबाबत आपण जाणून घेऊया.

1918 साली पहिल्या महायुद्धाच्या नंतरच्या काळात, व्हाईसरॉय यांनी महात्मा गांधींना दिल्लीतील एका युद्ध परिषदेसाठी बोलावले. कदाचित गांधीनी त्यांचा इंग्रज साम्राज्यास असलेला पाठिंबा दर्शवावा आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीसाठी मदत मिळवावी हा त्यामागचा हेतू होता.

महात्मा गांधीनी भारतीयांना सक्रियपणे युद्धात उतरवण्याची तयारी दर्शवली. जून 1918 मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका 'फौजेत भरती होण्याचे आवाहन'मध्ये महात्मा गांधी यांनी म्हटले आहे की,  "ही गोष्ट (स्वातंत्र्य) प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्यामध्ये स्वतःचे रक्षण करण्याची क्षमता असली पाहिजे, म्हणजेच शस्त्र बाळगण्याची आणि वापरण्याची क्षमता...... आपल्याला जर शस्त्र सर्वाधिक कौशल्याने वापरण्याची कला अवगत करायची असेल तर फौजेत भरती होणे हे आपले कर्तव्य आहे," असे जरी असले तरी व्हाईसरॉय यांच्या खासगी सचिवास लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात "वैयक्तिकरीत्या कोणालाही, मित्र व शत्रूस, मारणार नाही अथवा जखमी करणार नाही."

महात्मा गांधींच्या युद्धभरतीने त्यांच्या अहिंसेबद्दलच्या एकजिनसीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यांचा मित्र चार्ली आंद्रीउस नमूद करतो - "वैयक्तिकरीत्या मला कधीही त्यांच्या ह्या वर्तणुकीचा त्यांच्या स्वतःच्या इतर वर्तनांशी मेळ घालता आला नाही. ज्यावर मी वेदनादायकरीत्या असहमत झालो आहे हा त्या मुद्यांपैकी एक आहे."
 

Web Title: Mahatma Gandhi Death Anniversary: The Role of Mahatma Gandhi's First World War

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.